राष्ट्रवादीत बेशिस्तपणा? राजन पाटलांनी सांगितलं अजित पवारांची साथ सोडण्याचं नेमकं कारण; भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर मिश्किल विधान म्हणाले…

Rajan Patil : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा पक्का निर्धार माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे. ते लवकरच भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी स्वःत दिले आहेत. यामुळे आता मोहोळचे राजकीय समीकरणं बदलणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत होत्या.
अखेर त्यांनी माध्यमांसमोर येत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला रामराम केल्याचे नेमकं कारण काय आहे, याबाबत गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शिस्तीचे पण पक्षात मात्र बेशिस्तपणा वाढला असल्याचे पाटील म्हणाले.
अजित दादा हे अतिशय शिस्तप्रिय आहे आणि त्यांच्यातील शिस्त पाहून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण अलीकडे बेशिस्तपणा वाढला. म्हणून आम्ही भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : नाशिकमध्ये ‘कमळ’ सोडून हाती ‘मशाल’! ‘या’ दोन नेत्यांचा निर्धार; भाजपला धक्का, उबाठाचं ‘बळ’ वाढणार…
यावेळी त्यांनी पक्षात निष्ठेला फार महत्व उरलेले नाही. त्या उलट भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे. हे आमच्या धान्यात आल्याने आम्ही पक्षातून अलिप्त आहोत, असे राजन पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले असले तरी नेमका प्रवेश कधी करणार? पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधीचा? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर पाटील यांनी मिश्किल विधान केले. मुहूर्त शोधायला ते काय लग्न आहे का? असे राजन पाटील म्हणाले.
मी छोट्या माणसाबद्दल…
राजन पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दांत राजन पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा : IND vs AUS : पहिल्याच सामन्यात विराट कोहलीसोबत हे काय घडलं? ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच झालं असं





