IndiGo Crisis : इंडिगोच्या संकटामुळे BCCI ची धावपळ; SMAT चे नॉकआऊट सामने इंदूरहून पुण्यात हलवले!

पुण्यात होणार ‘SMAT’ चे नॉकआऊट सामने –
नॉकआऊट फेरीतील शेवटचे १२ सामने, सुपर लीग आणि फायनलचे सामने मूळतः इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियम आणि एमराल्ड हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित केले जाणार होते. पण आता हे सर्व सामने पुणे येथील *एमसीए स्टेडियम आणि डीवाय पाटील अकादमी येथे होणार आहेत.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (MPCA) मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पंडित यांनी या बदलाला दुजोरा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित पंडित यांनी १५ दिवसांपूर्वीच बीसीसीआयला कळवले होते की ते नॉकआऊट सामन्यांचे आयोजन करू शकणार नाहीत. इंडिगो संकटाव्यतिरिक्त, ९ ते १२ डिसेंबर दरम्यान इंदूरमध्ये डॉक्टरांचे जागतिक संमेलन असल्याने हॉटेलचे रूम्स उपलब्ध नसणे हे देखील ठिकाण बदलण्याचे एक प्रमुख कारण आहे.
हेही वाचा – Sunil Narine : केकेआरसाठी IPL 2026 मध्ये ‘हा’ खेळाडू ठरु शकतो एक्स फॅक्टर ; सुनील नरेनचा दावा
बीसीसीआय समोर मोठे लॉजिस्टिक आव्हान –
बीसीसीआयने सामन्यांचे ठिकाण बदलले असले तरी, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाला आता काही गंभीर लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. एसएमएटीच्या चार ग्रुप स्टेज ठिकाणांवरून (अहमदाबाद, कोलकाता, लखनऊ आणि हैदराबाद) खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि अधिकाऱ्यांना पुण्याला आणावे लागणार आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’
इंडिगोचे संकट असेच कायम राहिल्यास, ८ संघांसह पंच आणि इतर अधिकाऱ्यांचे पुणे प्रवास व्यवस्थापन करणे हे एक मोठे आव्हान ठरू शकते. याव्यतिरिक्त, महिला अंडर-२३ टी२० ट्रॉफी आणि पुरुष अंडर-१९ कूच बिहार ट्रॉफी देखील सध्या सुरू आहेत, ज्यामुळे संघांना सतत प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीत बीसीसीआय या संकटावर कशी मात करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





