IndiGo Airlines system slowdown: भारतातील विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; संपूर्ण सिस्टम स्लोडाउन

नवी दिल्ली – इंडिगो एअरलाइन्सची यंत्रणा तांत्रिक कारणांमुळे अतिशय संथ गतीने काम करत आहे. विमान कंपन्यांच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये ही समस्या निर्माण झाली असून, त्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाण सेवांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून चेक इन आणि बॅगेज तपासणीसाठी विविध विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
#6ETravelAdvisory : We are currently experiencing a temporary system slowdown across our network, affecting our website and booking system. As a result, customers may face increased wait times, including slower check-ins and longer queues at the airport. (1/3)
— IndiGo (@IndiGo6E) October 5, 2024
इंडिगोकडून निवेदन जारी –
इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘आम्ही सध्या आमच्या नेटवर्कवर सिस्टिम मंदावण्याच्या समस्येचा सामना करत आहोत. आमची वेबसाइट आणि बुकिंग सिस्टीमही यामुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. चेक-इन मंद होत असून विमानतळांवर लांबच लांब रांगा आहेत.
इंडिगोने म्हटले आहे की, ‘आमचा विमानतळ संघ पूर्ण समर्पणाने काम करत आहेत आणि प्रवाशांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. परिस्थिती लवकर सामान्य व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. (IndiGo Airlines system slowdown)





