Indigo Airlines Controversy । इंडिगो एअरलाइन्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाने एअरलाइन्सच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये एससी/एसटी कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गंभीर आरोप केले आहेत. कंपनीच्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी पायलटला जातीच्या आधारावर अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रार करणाऱ्या वैमानिकाने, तो विमान उडवण्यास योग्य नाही असे सांगून त्याचा अपमान करण्यात आला आणि त्याला अपमानास्पदपणे ‘विमान उडवता येत नसेल तर चप्पल शिवायला जा ‘ असे म्हटले आहे. बंगळुरूमध्ये प्रथम हा खटला झिरो एफआयआर म्हणून नोंदवण्यात आला होता. जो नंतर गुरुग्राममधील डीएलएफ फेज-१ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. एफआयआर नोंदवल्यानंतरही, इंडिगो एअरलाइन्सने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या, पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशिक्षणार्थी पायलटचे वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप Indigo Airlines Controversy । ३५ वर्षीय प्रशिक्षणार्थी वैमानिकाने त्याच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. त्याला जातीच्या आधारावर शिवीगाळ करण्यात आली, कामाच्या बहाण्याने अपमानित आणि छळ करण्यात आला. वैमानिकाने आपल्या तक्रारीत काय म्हटले ? Indigo Airlines Controversy । वैमानिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २८ एप्रिल रोजी त्याला इंडिगोच्या मुख्य कार्यालयात (एमार कॅपिटल टॉवर-२, गुरुग्राम) बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. तिथे उपस्थित असलेल्या तापस डे, मनीष साहनी आणि कॅप्टन राहुल पाटील यांनी त्याला शिवीगाळ केली आणि जातीवाचक टिप्पणी केली. वैमानिकाने आरोप केला आहे की, “मी ऑफिसमध्ये पोहोचताच मला माझा फोन आणि बॅग बाहेर ठेवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बैठकीत ते म्हणाले – तू विमान उडवण्याच्या लायक नाहीस, परत जा आणि चप्पल शिवून घे. इथे तू चौकीदार राहण्याच्या लायकही नाहीस.” पीडित वैमानिकाने सांगितले की, त्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि नीतिमत्ता समितीसमोरही हा विषय उपस्थित केला होता, परंतु कोणतीही सुनावणी झाली नाही. शेवटी त्याला एससी/एसटी सेलशी संपर्क साधावा लागला आणि एफआयआर नोंदवावा लागला.