Air India and Indigo Flight: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला; दोन्ही विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित, नेमकं काय घडलं?
Air India and Indigo Flight : मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले.

Air India and Indigo Flight: अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे वेळीच पायलटच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
यानंतर आता आणखी एक माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासल्याची घटना घडली आहे. Air India and Indigo Flight
एअर इंडियाच्या टेक-ऑफपूर्वी आणि इंडिगो विमानाच्या लँडिंगनंतर टॅक्सींगदरम्यान दोन्ही विमानांच्या पंख्यांचा परस्पर संपर्क झाला. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने सुटकेचा निश्वास सोडला. Air India and Indigo Flight
नेमकं काय घडलं? Air India and Indigo Flight
एअर इंडियाचे AI2732 हे उड्डाण 3 फेब्रुवारी रोजी मुंबईहून कोईंबतूरकडे जाणार होते. टेक-ऑफपूर्वी हे विमान टॅक्सीवेवर थांबले होते, त्याचवेळी लँड झालेले इंडिगो विमान टॅक्सिंगसाठी त्या ठिकाणी आले.
इंडिगोचे विमान हे हैदराबादहून मुंबईला पोहोचले. लँडिंग झाल्यानंतर टॅक्सिंग दरम्यान ही घटना घडल्याचं इंडिगो कंपनीने स्पष्ट केलं.
यावेळी इंडिगो विमानाच्या पंख्याची आणि एयर इंडिया विमानाच्या पंख्याची एकमेकांना धडक बसली. मात्र ही धडक जोरात बसली नसल्याने सुदैवाने मोठा अपघात झाला नाही. परंतु यात एअर इंडियाच्या विमानाच्या पंख्याचे म्हणजे विंगटिपचे नुकसान झाले. Air India and Indigo Flight
यानंतर दोन्ही विमानांमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून त्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
विमानाचे टॅक्सिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. संबंधित विमानाची देखभाल तपासणी केल्याची माहिती इंडिगोने दिली. Air India and Indigo Flight
घटनेनंतरची दोन्ही विमानांची तपासणी
दोन्ही कंपन्यांनी या घटनेची माहिती तत्काळ संबंधित नियामक प्राधिकरणांना दिली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे विमानतळावरील टॅक्सिंग प्रक्रियेबाबत चौकशी झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडिया आणि इंडिगो विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. Air India and Indigo Flight
हेही वाचा :
Chandrapur Election: चंद्रपूर महापौरपदाचा तोडगा सुटला; दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर कोण ठरलं वरचढ?






