Junnar News : ते रिल्स बनवणाऱ्या चालकांवर कारवाईचे संकेत: नारायणगाव पोलिसांची माहिती

वारुळवाडी: नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती, नारायणगाव येथे सर्व संचालक मंडळ, व्यापारी वर्ग, वाहनचालक व शेतकरी वर्ग यांच्यासोबत सुरक्षा व नियमन विषयक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण व कायद्याचे पालन यासंदर्भात नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या.
यामध्ये शेलार यांनी सर्व वाहनचालकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंग स्थळीच लावावीत, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा वाहन चालवताना मोबाईलवर रिल्स बनवणे, नागमोडी चालवणे यामुळे अपघात होऊ शकतो. यावर प्रतिबंध घालण्यासाठी चालकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.
महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या वाहनांमुळे रहदारीची समस्या उद्भवू नये यासाठी संचालक व कामगारांना योग्य नियोजन करण्यास सांगण्यात आले. त्याच बरोबर व्यापाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना कामावर न ठेवण्याबाबत सूचना देतानाचाबाजार समितीतील सर्व सीसीटीव्ही कार्यरत आहेत का याची खातरजमा करून डी व्ही आर सुरक्षित ठेवावा. तसेच परिसरात नाईट व्हिजन कॅमेरे बसावावेत.
बाजार समितीत येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावी. केवळ वैध परवानाधारकांना वाहन चालवण्यास परवानगी द्यावी. संचालक मंडळाने वेळोवेळी व्यापारी व कामगारांना माईकद्वारे सूचना द्याव्यात विशेषतः धनामेथी व टोमॅटो व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. बाजार समिती परिसर स्वच्छ ठेवून रोगराई पसरणार नाही याची खबरदारी. परिसरात लहान मुले, शालेय विद्यार्थी असल्याने वाहने मंदगतीने चालवावीत. अनोळखी व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.
रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावून वाहतूक अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकरी आंदोलने व सभे बाबत आगाऊ माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठ्या रकमेचे व्यवहार सुरक्षितपणे करावेत, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत संचालक मंडळ व व्यापारी वर्गाच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या.





