Tokyo Olympics : घोडेस्वारीत भारताचा फवाद मिर्झा अपयशी
Updated On:

टोकियो – भारताचा नवोदित घोडेस्वार फवाद मिर्झाने 47.20 अशी गुणसंख्या नोंदवताना पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. त्याने या गुणसंख्येच्या जोरावर अंतिम फेरीत स्थानही मिळवले होते. त्याला पदकाच्या शर्यतीत मात्र अपयशाचा सामना करावा लागला.
मिर्झा हा यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणारा भारताचा गेल्या दोन दशकांनंतरचा पहिलाच घोडेस्वार आहे. तसेच स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा भारतीय घोडेस्वार ठरला आहे.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा फवाद हा तिसरा भारतीय घोडेस्वार आहे. यापूर्वी भारताच्या इंद्रजीत लांबाने 1996 सालच्या अटलांटा स्पर्धेत, तर इम्तियाज अनिसने 2000 सालच्या सिडनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.





