Sanjay Raut : अमेरिका इराण-इस्त्राइल संघर्षात मध्यस्थी करत शस्त्रसंधी घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रक्रियेमुळे पाकिस्तान पुन्हा जागतिक स्तरावर चर्चेत आला असून, भारतासाठी ही लाजिरवाणी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधत “ते फक्त टेलिफोन ऑपरेटरसारखे काम करत आहेत” असा टोला लगावला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? Sanjay Raut “भारताची अवस्था मोदींमुळे डोरपोक उंदरासारखी झालीयं. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदूस्तानच्या पंतप्रधानांनी काय करावं, टेलिफोन अॅापरेटरचं काम केलं”. यामध्ये ते बिझी होते. सौदी अरेबिया, जॉर्डन, नेपाळ, दुबई, इराण यांच्याशी फोनवरुन बोलत असतात. पण युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला मिळालं.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. राऊत पुढे म्हणाले की, या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. आखाती देशांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. मात्र, इराणने अमेरिका आणि इस्रायलसारख्या शक्तींना शरणागती पत्करली नाही आणि दीर्घकाळ संघर्ष करत आपली भूमिका ठाम ठेवली. “देशासाठी लढण्याची आणि बलिदान देण्याची शिकवण इराणने दिली,” असे ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. Sanjay Raut हे श्रेय भारताला का नाही? राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की, युद्धात मध्यस्थी करण्याचे श्रेय अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला मिळत असताना भारत कुठे आहे? “हे श्रेय नरेंद्र मोदी यांना मिळायला हवे होते. त्यांनी अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या नेत्यांना एकत्र आणून शांततेचा संदेश द्यायला हवा होता,” असे ते म्हणाले. मात्र, भारताची कोणतीही ठोस भूमिका नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच देशांतर्गत राजकारणावर लक्ष केंद्रित करत असताना जागतिक घडामोडींमध्ये भारत मागे पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. Sanjay Raut पाकिस्तानला प्रतिष्ठा मिळण्यास मोदी सरकार जबाबदार राऊत म्हणाले की, इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे, जे भारतासाठी धक्कादायक आहे. “ज्या इस्लामाबादवर ताबा मिळवण्याच्या घोषणा केल्या जात होत्या, त्याच ठिकाणी आता जागतिक नेते शांततेवर चर्चा करत आहेत,” असे ते म्हणाले. हेही वाचा : Healthy Breakfast: दररोज उपमा-पोहे-इडली खाताय? फायदे की तोटे…एक्सपर्टने दिला महत्त्वाचा सल्ला