Jamkhed News : जामखेड तालुक्यात ‘दादांची प्रतिमा’ अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद
या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सुमारे २४० शाळा आणि विविध शासकीय कार्यालयांसह (Jamkhed News) तब्बल ४०० ठिकाणी स्व. अजितदादांच्या आकर्षक फोटो फ्रेमचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.

Jamkhed News : महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरोगामी विचार, धडाडीचे कार्य आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातील ऐतिहासिक योगदान समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत (Jamkhed News) पोहोचावे या अत्यंत उदात्त आणि ध्येयवादी उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जामखेड तालुक्यात ‘दादांची प्रतिमा’ हे भव्य अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सुमारे २४० शाळा आणि विविध शासकीय कार्यालयांसह (Jamkhed News) तब्बल ४०० ठिकाणी स्व. अजितदादांच्या आकर्षक फोटो फ्रेमचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.
या नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील सर्व स्तरांतून अभूतपूर्व स्वागत व कौतुक होत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव होते.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी धनंजय बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक महेश निमोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे, गणेश काळे, मनसे नेते सनी सदाफुले, सहायक गटविकास अधिकारी अमित बोराटे, विस्तार अधिकारी नाना खैरे साहेब, भजनावळे, कृषी अधिकारी मिसाळ साहेब, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील,शिक्षक नेते नारायण राऊत, मुकुंदराज सातपुते, केशवराज कोल्हे, संतोष डमाळे,माध्यमिक शिक्षक संघटनेचे कोपनर सर, अमोल पवार यांच्यासह शिक्षण व इतर शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकारी, शिक्षक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकात संध्याताई सोनवणे म्हणाल्या की, “शासनाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा महापुरुषांच्या अधिकृत जयंती यादीत समावेश करून दादांच्या कर्तृत्वाचा मोठा गौरव केला आहे.
याबद्दल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “येत्या काळात जयंतीच्या वेळी प्रतिमांची टंचाई भासू नये, तसेच तालुक्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आणि अगदी वाडी-वस्तीपर्यंत दादांचे कार्य आणि विचार पोहोचून भावी पिढीला व नागरिकांना त्यातून ऊर्जा मिळावी, याच सामाजिक बांधिलकीतून आम्ही या अभियानाची आखणी केली आहे.”
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन (Jamkhed News) ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मनोहर इनामदार यांनी मानले. स्व. दादांच्या विचारांचा जागर थेट ग्रामपंचायती आणि शाळांपर्यंत पोहोचवणाऱ्या या अभियानामुळे संध्या सोनवणे यांच्या दूरदृष्टीचे आणि कुशल नेतृत्वगुणांचे संपूर्ण तालुक्यातून जोरदार कौतुक होत आहे.






