भारताचे पाकला चोख प्रत्युत्तर…! पाकिस्तानी कलाकार हानिया आणि माहिरा पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

Hania Aamir | Mahira Khan | भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने काल रात्री उशिरा अॅापरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ला कर पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्धवस्त करीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता सर्व स्तरातून या मोहिमेचे कौतुक केले जात आहे. यावर आता पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये पोस्ट शेअर करताना तिने लिहिले आहे की, ‘माझ्याकडे सध्या चांगले शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, वेदना आणि दुखावलेले हृदय आहे. एक मूल गेले, कुटुंबे विखुरली गेली आणि कशासाठी? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणाचेही रक्षण करत नाही. ही निव्वळ क्रूरता आहे. तुम्ही निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकून त्याला रणनीती म्हणू शकत नाही. ही ताकद नाही, हा भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला पाहत आहोत, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
भारताच्या या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर केवळ हानिया आमिरच नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननेही देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘खूपच भित्रा.’ अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो आणि आपल्याला बुद्धी देवो. आमेन.’ असे म्हणत पोस्ट केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतापला होता. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याला भारताने हवाई हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.





