Operation Sindoor : पाकिस्तान जिंदाबाद ! ‘या’ कलाकारांची पोस्ट चर्चेत, भारताबद्दल वापरले संतापजनक शब्द, वाचा….

Operation Sindoor : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराने मिळून पाकिस्तानातील लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 9 दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले करून त्यांचा पूर्णपणे नायनाट केला.
या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडाली असून, तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. भारताच्या या धडाडीच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान घाबरला असून, सरेंडर करण्याच्या तयारीत आहे. तर काही पाकिस्तानी कलाकारांनी भारताबद्दल संतापजनक शब्द वापरले असल्याचं दिसून आलं आहे.
हानिया आमिर, माहिरा खान यांसारख्या पाकिस्तानी अभिनेत्रींनंतर फवाद खानने सोशल मीडियाद्वारे भारताबद्दल संतापजनक शब्द वापरले आहे. भारताने केलेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असं म्हटलंय.
फवाद खान म्हणाला की, “या लज्जास्पद हल्ल्यात प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबीयांसाठी मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो.
माझी सर्वांना आदरयुक्त विनंती आहे, गोंधळ उडवणाऱ्या शब्दांनी आग पेटवणं थांबवा. निष्पाप लोकांच्या जीवाच्या किंमतीवर तरी नाही. सर्वांना सदबुद्धी मिळो, इन्शाल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
माहिरा खान आणि हानिया आमिर या सेलिब्रिटींनीही भारताकडून झालेल्या हवाई हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. एकीकडे या हल्ल्यात एकही नागरिक मारल्याचा रिपोर्ट नसल्याचा दावा भारतीय सैन्याकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिकांनी यात जीव गमावल्याचा दावा पाकिस्तानकडून होत आहे.
जागतिक पातळीवर भारताच्या कारवाईचं कौतुक :
ऑपरेशन सिंदूरच्या या यशस्वी कारवाईनंतर जागतिक पातळीवर भारताच्या धोरण आणि सैन्यशक्तीचं कौतुक होत आहे. पहलगाम येथील हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि 20 जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक कारवाई करून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
भारताचा इशारा :
भारताने स्पष्ट केलं आहे की, ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवरच लक्ष केंद्रित करून करण्यात आली असून, पाकिस्तानच्या लष्करी तळांना हात लावण्यात आलेला नाही. तरीही, भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे की, दहशतवादाला पाठिंबा देण्याची किंमत त्यांना भविष्यातही चुकवावी लागेल.
या कारवाईने भारताने पुन्हा एकदा आपली ‘झिरो टॉलरन्स टू टेररिझम’ ही नीती जगासमोर मांडली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताच्या सामरिक आणि लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन जगभरात झालं आहे.






