Mahira Khan : ‘माहिरा खान’चा नवरा आहे अब्जाधीश बिझनेसमन; संपत्तीचा आकडा ऐकून उडेल झोप…

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘रईस’ चित्रपटातील अभिनेत्री ‘माहिरा खान’ (Mahira Khan) विवाहबंधनात अडकली आहे. सध्या तिच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिरा खानने सलीम करीम (salim karim) याच्यासोबत रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी लग्न केले.
माहिराचा मॅनेजर अनुशय तलहा खानने इन्स्टाग्राम लग्नातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यात माहिरा सलीमकडे चालत जात असल्याचे दिसते. यावेळी माहिराला पाहून सलीम भावूक झाल्याचे दिसते. माहिरा वधुच्या वेशात फारच सुंदर दिसत आहे.
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता आणि ओढणीने आपला चेहरा झाकून घेतला होता. अभिनेत्रीच्या या क्यूट लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर सलीमने काळ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर निळ्या रंगाची पगडी परिधान केली होती.
दरम्यान, तुम्हाला माहित का? माहिरा खानने ज्या व्यक्ती सोबत लग्नगाठ बांधली आहे. तो ‘सलीम करीम’ फिल्म इंडस्ट्रीत काम करत नसून, एक बिझनेसमन आहे आणि पाच वर्षांपासून माहिराला डेट करत आहे. सलीम हा माहिराचा चांगला मित्रही आहे.
माहिरा खानने अखेर तिचा बॉयफ्रेंड सलीमसोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या या अभिनेत्रीच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिराचा नवरा पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचा भाग नाही. तो एक बिझनेसमन आहे आणि पाच वर्षांपासून माहिराला डेट करत आहे. सलीम हा माहिराचा चांगला मित्रही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम सिंपैसा नावाच्या प्रसिद्ध स्टार्ट-अप कंपनीचे सीईओ आहेत. ही कंपनी 15 हून अधिक देशांतील विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांना सुविधा पुरवते. सलीम आणि माहिरा पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेटले होते. या कार्यक्रमाची निर्मिती टेलिव्हिजन ऍप्लिकेशन, Tapmad TV ने केली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महिराने 2020 मध्ये आपण ‘सलीम करीम’ला डेट करत असल्याची माहिती दिली.





