Paris Olympics 2024 (Weightlifting) : “माझ्या मासिक पाळीचा…”; कांस्यपदक थोडक्यात हुकल्यानंतर मीराबाई चानूची प्रतिक्रिया आली समोर…

Paris Olympics 2024 (Mirabai Chanu,Weightlifting) – ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूलाही कांस्यपदकाने हुलकावणी दिली. अवघ्या एक किलोच्या फरकाने मीराबाई चानूला हार पत्करावी लागल्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. पदकाने हुलकावणी दिल्याबद्दल मीराबाई चानूने नशिबाला दोष देत मासिक पाळीचाही उल्लेख केला आहे. तसेच, प्रत्येक खेळाडू अशा परिस्थितीतून जातच असतो असेही ती यावेळी म्हणाली.
“यावेळीही मी माझे 100 टक्के देऊन पदक जिंकण्याचा प्रयत्न केला. आशियाई स्पर्धांमध्ये मी जखमी झाले होते. ही जखम भरून काढायला काही वेळ जावा लागला. पण यावेळी मी पूर्णपणे तयारी केली होती. परंतु, यावेळीही नशिबाने साथ दिली नाही. आज मासिक पाळीचा माझा तिसरा दिवस आहे. मागच्या ऑलिम्पिकमध्येही माझा दुसरा दिवस होता. यामुळेही शरीरात थोडाफार बदल होतो. वेटलिफ्टिंगमध्ये वजन उचलताना त्याचा परिणाम थेट तुमच्या पोटावर होत असतो. परंतू तरीही, मी पूर्णपणे प्रयत्न केला होता”, असे चानू म्हणाली.
#WATCH | Paris: Indian Weightlifter Mirabai Chanu speaks on finishing 4th in women’s 49 kg weightlifting event at #ParisOlympics2024
She says, “I tried my best to win a medal for the country but I missed it today…It is a part of the game, we all sometimes win and sometimes… pic.twitter.com/hPyYCt7AOL
— ANI (@ANI) August 7, 2024
“मी आजच्या खेळाने आनंदी आहे. खेळाडूबरोबर काही ना काही होत असते. जखमांसहित अनेक गोष्टी मी सहन करत होते. रिओच्या पहिल्या ऑलिम्पिकमध्येही माझे मेडल गेले होते. असेच प्रत्येक खेळाडूबरोबर नशीब कधी चांगले-वाईट असते. रिओमध्ये अपयशी ठरले होते. पण त्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पिअन ठरले. टोकिओ ऑलिम्पिकमध्ये मी पहिल्यांदा सिल्वर मेडल जिंकले होते”, असे चानू पुढे म्हणाली.
Paris Olympics 2024 (Weightlifting) : मीराबाई चानूचे पदक थोडक्यात हुकले…
अन् पदकावर पाणी सोडावे लागले…
जगभरातल्या अव्वल वेटलिफ्टर्सशी स्पर्धा करताना मीराबाईच्या खांद्यांवर तमाम भारतीयांच्या आशांचाही भार होताच. पण त्यातूनही तिनं दमदार कामगिरी केली. पहिल्या स्नॅचमध्ये काहीशा मागे पडलेल्या मीराबाईने पुढच्या दोन स्नॅचमध्ये कमबॅक केले. क्लीन अँड जर्कमध्येही मीराबाईची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. पण पहिल्या स्नॅचमधल्या पिछाडीचा मीराबाई चानूला फटका बसला आणि शेवटी अवघ्या एका किलोच्या फरकाने तिला कांस्यपदकावर पाणी सोडावे लागले




