विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; कर्णधारपदी हरमनप्रीत सिंग कायम

नवी दिल्ली – भारताच्याच यजमानपदाकाळी ओडिशामध्ये येत्या 13 जानेवारीपासून विश्वकरंडक हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघ जाहिर झाला असून संघाचे नेतृत्व अनुभवी ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे.
“तू लढवय्या आहेस, लवकर बरा हो…”द्रविडसह भारतीय खेळाडूंच्या ऋषभ पंतसाठी शुभेच्छा
भारताचा समावेश यु गटात करण्यात आला आहे. याच गटात भारतासह इंग्लंड, स्पेन व वेल्स या संघाचा समावेश आहे. संघाचे उपकर्णधारपद अमित रोहिदासकडे सोपवण्यात आले आहे. बंगळुरूत पार पडलेल्या निवड चाचणी शिबीरानंतर संघाची घोषणा करण्यात आली. या चाचणीत सहभागी झालेल्या 33 खेळाडूंमधून अनुभवी तसेच युवा खेळाडूंचा समतोल साधत हा संघ जाहीर करण्यात आल्याची माहिती भारतीय हॉकी महास्घाने दिली आहे.
“तू लढवय्या आहेस, लवकर बरा हो…”द्रविडसह भारतीय खेळाडूंच्या ऋषभ पंतसाठी शुभेच्छा
या स्पर्धेत भारताची सलामी 13 जानेवारीला स्पेनशी होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना इंग्लंडविरूद्ध तर त्यानंतर वेल्सविरूद्ध सामने होतील. स्पर्धेची बाद फेरी 22 जानेवारी, क्रोसओव्हर सामने 23 जानेवारी, तर उपांत्यपूर्व सामने 25 जानेवारीला सामने होतील. 27 जानेवारीला उपांत्य लढती तर 29 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.
भारताचा पुरूष हॉकी संघ – हरमनप्रीत सिंग (कर्णधार), कृष्णा बहादूर पाठक, श्रीजेश परट्टू रविंद्रन, जरमनप्रीत सिंग, सुरेंद्र कुमार, वरूण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंह, नीलकांत शर्मा, शमशेर सिंह, विवेक सागर प्रसाद.





