#CairnsCup : कोनेरू हम्पीने पटकावले विजेतेपद

सेंट लुइस (अमेरिका) : वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन कोनेरू हम्पी हिने कायर्न्स कप बुध्दिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत भारताच्याच द्रोणावली हरिकाविरूध्दचा डाव बरोबरीत सोडवित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हम्पी या स्पर्धेत ६ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी राहिली. तिचे हे मागील दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद आहे.
Congratulations to GM Humpy Koneru
🇮🇳
on winning the #CairnsCup 2020 at the @STLChessClub🏆
Humpy scored 6/9 to clinch clear first at the world's strongest women's tournament in history.
Humpy will take back home, $45,000 as prize money and a trophy! pic.twitter.com/Pa11zxmKlT
— Marshall Chess Club (@MarshallChessNY) February 17, 2020
या स्पर्धेत तिने चार डावांत विजय तर चार डावांत बरोबरी साधली. एका डावात तिला पराभव पत्कारावा लागला. या स्पर्धेतील विजयामुळे तिने जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच यासह तिला ४५ हजार डाॅलर रक्कमेचे पारितोषिक देखील मिळाले आहे.
Indian superstar Humpy Koneru 🇮🇳 received her #CairnsCup first prize from Jeanne and Rex Sinquefield at the @STLChessClub
At the closing ceremony today, Humpy admitted, she was glad to win the strongest women's tournament in history!
Humpy won $45,000 (INR 32 lacs approx.) pic.twitter.com/C4NDuU5sZR
— Chess.com – India (@chesscom_in) February 18, 2020
या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन वेंजून जू ही ५.५ गुणांसह दुस-या स्थानावर राहिली. तर, भारताची द्रोणावल्ली हरिका ४.५ गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर राहिली.





