Indian Super League 2024-25 : मोहन बागानकडून नॉर्थईस्ट पराभूत….

Mohun Bagan SG vs NorthEast United Highlights :- शुभाशीष बोसच्या दोन गोलच्या जोरावर मोहन बागानने नॉर्थईस्टला ३-२ असे पराभूत करताना आपली इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील आपली आगेकूच कायम राखली. मोहम्मद अली बेमामरच्या गोलने नॉर्थईस्ट युनायटेडने १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दीपेंदू बिस्वासने गोल करताना मोहन बागानला बरोबरी साधून दिली.
अलाउद्दीन अझराईने २४ व्या मिनिटाला पुन्हा गोल करून नॉर्थईस्टला २-१ असे आघाडीवर नेले. यानंतर ६१ व्या मिनिटाला गोल करून शुभाशीष बोसने पुन्हा एकदा बरोबरी साधली. त्यानंतर शुभाशीषने स्टॉपपेज टाइममध्ये ९१ व्या मिनिटाला गोल करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.
जी विजयासाठी निर्णायक ठरली. मोहन बागानचा हा दोन सामन्यातील पहिला विजय आहे. संघ गुणतालिकेत चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड दोन सामन्यांत पहिल्या पराभवानंतर तीन गुणांसह सातव्या स्थानावर आहे.


