ISL 2024-25 : रोमांचक सामन्यात हैदराबाद एफसीनं मारली बाजी, केरळ ब्लास्टर्सला केलं पराभूत…

Indian Super League 2024-25 | – आंद्रेई अल्बाच्या दमदार खेळीच्या जोरावर हैदराबाद एफसीने केरला ब्लास्टर्सला 2-1 असे पराभूत करताना आयएसएलमधील आपली आगेकूच कायम राखली.
🔥🔥 BRINGING ALL 3 POINTS BACK FROM KOCHI 🔥🔥
Back from a goal down but Andrei Alba wins it with a brace on a sparkling night in Kochi ✨️✨️
We are growing stronger by the game 👊#KBFCHFC #TheNawabs 💛🖤 pic.twitter.com/bIlppSjGn5
— Hyderabad FC (@HydFCOfficial) November 7, 2024
कोचीन येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये गुरूवारी झालेल्या (Kerala Blasters vs Hyderabad) लढतीत यजमान केरळ संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळाला सुरुवात करताना जीजस जिमेनेझने 13 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्स संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत ही आघाडी केरळ संघाने टिकवून ठेवली.
मध्यंतरानंतर हैदराबाद संघाकडून आक्रमण करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र अनेकदा चांगल्या चाली रचून देखील केरळचा बचाव भेदण्यास हैदराबाद संघाला मर्यादा येत होत्या. लढतीतील 43 व्या मिनिटाला आंद्रेई अल्बाने केरळ ब्लास्टर्सचा बचाव भेदताना हैदराबाद संघाच्या पहिल्या गोलची नोंद केली.
Korea Masters 2024 (Badminton) : भारतीय शटलर ‘किरण जॉर्ज’चा विजयी धडका कायम…
यावेळी दोन्ही संघाची 1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर 70 व्या मिनिटाला पुन्हा एकदा आंद्रेई अल्बाने सुरेख चाल करताना मैदानी गोल केला. अखेर हैदराबादकडे 2-1 अशी आघाडी झाल्यानंतर ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात हैदराबाद संघाला यश मिळाले.


