Chengdu Open 2024 (Final) : भांबरी-ऑलिवेट्टी ठरले उपविजेते…

Chengdu Open 2024 :- भारताचा युकी भांबरी व फ्रान्सच्या अल्बानो ऑलिवेट्टी यांच्या जोडीला चेंगडू ओपन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना फ्रान्सच्या अव्वल मानांकित सॅडिओ डुम्बिया आणि फॅबियन रेबोल जोडीने पराभूत करून विजेतेपद पटकावले.
अंतिम लढतीत युकी-अल्बानो यांच्या जोडीला 4-6, 6-4, 4-10 असे पराभूत व्हावे लागले. फ्रेंच जोडीचा भांब्री-ऑलिवेट्टीवरचा हा पहिला विजय होता. सुमारे दीड तास चाललेल्या या सामन्यात सुरुवातीचा सेट गमावल्यानंतर भांबरी आणि ऑलिवेट्टी यांनी दुसरा सेट जिंकून सामना टायब्रेकवर नेला.
Macau Open 2024 (Badminton) : मकाऊ ओपनमध्ये त्रिशा-गायत्रीची विजयी सलामी….
भारत आणि फ्रान्सच्या खेळाडूंच्या जोडीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या दोन एसेसच्या तुलनेत सहा एसेस मारले पण सहा डबल फॉल्ट त्यांना महागात पडले. दरम्यान, भांबरी आणि ऑलिवेट्टी या जोडीने एप्रिलमध्ये म्युनिकमध्ये बीएमडब्ल्यू ओपन आणि मेमध्ये गस्टाडमध्ये स्विस ओपन जिंकले होते.





