ISL 2024 : आयएसएलचा थरार 13 सप्टेंबरपासून…! जाणून घ्या, ओपनिंग मॅच अन् स्ट्रीमिंगसह सर्व डिटेस्ल एका क्लिकवर….

Indian Super League 2024-2025 : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेचा 2024-25 हंगाम 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना शील्ड विजेता मोहन बागान सुपर जायंट आणि चषक विजेता मुंबई सिटी एफसी यांच्यात होणार आहे. गेल्या मोसमाचा अंतिम सामनाही या दोघांमध्येच रंगला होता. आयएसएलने रविवारी हंगामातील पहिल्या 84 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जे या वर्षाच्या शेवटपर्यंत चालतील.
13 संघ होणार सहभागी….
आयएसएलच्या आगामी हंगामात 13 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये बेंगळुरू एफसी, चेन्नईयन एफसी, एफसी गोवा, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी, केरळ ब्लास्टर्स एफसी, मुंबई सिटी एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, ओडिशा एफसी, पंजाब एफसी याशिवाय मोहन बागान सुपरजायंट्स, ईस्ट बंगाल एफसी आणि मोहम्मडन स्पोर्टिंग यांचा समावेश आहे.
𝐁𝐀𝐂𝐊 𝐖𝐈𝐓𝐇 𝐀 𝐁𝐀𝐍𝐆! 💥
The much awaited Indian Super League 2024-25 kicks off on Friday, September 13, 2024, LIVE only on @JioCinema and @Sports18
Read More: https://t.co/hnwbvxorBB
ISL 2024-25 fixtures till 30th Dec, 2024 👉 https://t.co/c21rXWlvgR
Download the… pic.twitter.com/wgZ9oiJUNe
— Indian Super League (@IndSuperLeague) August 25, 2024
पहिल्यांदाच एका दिवसात होणार दोन सामने…
सुरुवातीच्या वीकेंडला 14 सप्टेंबर रोजी सीझनच्या पहिल्या वेळी एका दिवसात दोन सामने होतील जेव्हा चेन्नईयिन एफसी त्यांच्या घरच्या मैदानावर ओडिशा एफसीशी खेळेल तर बेंगळुरू एफसीचा सामना ईस्ट बंगाल एफसीशी होईल. दुसऱ्या दिवशी, केरळ ब्लास्टर्स एफसी कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंजाब एफसीविरूध्द लढेल तर हैदराबाद एफसी 19 सप्टेंबर रोजी घरच्या मैदानावर बेंगळुरू एफसी विरुद्ध पहिला सामना खेळेल. तथापि, हैदराबाद एफसीचे सामने फिफ क्लब परवाना पात्रता पूर्ण करण्यावर अवलंबून असतील.
यावेळी आय-लीग चॅम्पियन मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबही या स्पर्धेचा एक भाग आहे. हा नवनिर्मित आयएसएल संघ 16 सप्टेंबरला नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध त्याच्या होम ग्राउंड किशोर भारती क्रिडागंणावर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मोहन बागान आणि ईस्ट बंगालसह तीन मोठे कोलकाता क्लब विजेतेपदासाठी आव्हान देतील.
सामन्याचे टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहावे?
Viacom18 कडे इंडियन सुपर लीगचे प्रसारण हक्क आहेत. जे स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर फुटबॉलचे सर्व सामने थेट प्रसारित करेल, तसेच स्पोर्ट्स 18 त्याच्या अधिकृत OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर थेट प्रक्षेपण उपलब्ध करेल. जिथे चाहत्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय सामन्याचा आनंद घेता येणार आहे.





