Indian Squad : आशिया कपसाठी भारताचा संघ जवळपास निश्चित! कोणाला संधी आणि कोण बाहेर? जाणून घ्या

Indian Squad for Asia Cup 2025 : आशिया कप 2025 ची सुरुवात पुढील महिन्यात, 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या टी-20 स्वरूपातील स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून, सर्व सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवले जाणार आहेत. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाची निवड 19 ऑगस्ट 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उद्या (19 ऑगस्ट) मुंबईत कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत बैठक घेणार असून, त्यानंतर संघाची अंतिम घोषणा होईल. बीसीसीआय कधी आणि कोणत्या खेळाडूंची निवड करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहा खेळाडूंची जागा पक्की –
माध्यमांच्या अहवालानुसार, भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाज, फिरकी अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांच्या जागेसाठी तीव्र स्पर्धा आहे. तरीही, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या जागा जवळपास निश्चित मानल्या जात आहेत.
जसप्रीत बुमराहची पुष्टी –
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालानुसार, जसप्रीत बुमराहने आशिया कपसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उर्वरित ९ जागांसाठी निवडकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बुमराहच्या समावेशामुळे संघाला मोठा आधार मिळेल.
फिरकी गोलंदाजांमध्ये कोणाला संधी?
फिरकी गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागा जवळपास निश्चित आहेत. दोघांनीही अलीकडच्या काळात भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय, वॉशिंग्टन सुंदरच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संधी मिळू शकते. क्रुणाल पंड्याच्या नावावरही विचार होईल, परंतु त्याची पुनरागमनाची शक्यता कमी आहे. क्रुणालने आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा धमाका! शतक झळकावत ठोकली पुनरागमनाची दावेदारी
आशिया कप 2025 साठी भारताचा संभाव्य संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, जितेश शर्मा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा. राखीव खेळाडू : वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.





