Tanveer Ahmed : ‘…तर विराटप्रमाणे निवृत्ती घ्या’, माजी खेळाडूने मारला टोमणा; बाबर-रिझवानच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह?

Tanveer Ahmed statement : पाकिस्तान क्रिकेट विश्वात सध्या खळबळ माजवली आहे, कारण स्टार खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना आगामी आशिया कपच्या संघातून वगळण्यात आले आहे. यावर चाहते आणि तज्ज्ञ यांच्यात मतभेद पाहायला मिळत आहेत. काहीजण या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काहींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या चर्चेदरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदने बाबर आणि रिझवान यांना थेट निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
तनवीर अहमदने दिला निवृत्तीचा सल्ला –
त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचे उदाहरण देत दोघांच्या आत्मसन्मानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तन्वीर अहमदने सोशल मीडियावर लिहिले, “बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना जर असे वाटत असेल की त्यांचा अपमान झाला आहे, तर त्यांनी विराट कोहलीसारखा मार्ग निवडावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. आपला सन्मान आपल्या हातात आहे.”
Tanveer Ahmed 👀#AsiaCup #BabarAzam #MuhammadRizwan #CricketTwitter pic.twitter.com/zjLHg7vidJ
— Pakistan Cricket (@pakcricket97) August 17, 2025
विराट कोहलीचं प्रकरण काय होतं?
तन्वीरने कोहलीचा उल्लेख केला असला, तरी कोहलीने अपमानामुळे निवृत्ती घेतली नव्हती. कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना सांगितले होते की, कसोटी हा अत्यंत कठीण फॉरमॅट आहे आणि त्याच्या शरीराला त्याच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत. काही अटकळी अशाही होत्या की, बीसीसीआयच्या दबावामुळे कोहलीने हा निर्णय घेतला.
हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा धमाका! शतक झळकावत ठोकली पुनरागमनाची दावेदारी
बाबर-रिझवानची कामगिरी –
बाबर आझमबद्दल बोलायचे झाले, तर काही काळापूर्वी तो टी-20 क्रमवारीत जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक होता. गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या बॅटमधून टी-20 मध्ये धावांचा पाऊस पडत होता आणि त्याने अनेक विक्रम मोडले होते. मागील टी-20 विश्वचषकात तो पाकिस्तानचा कर्णधारही होता. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानचाही फॉर्म गेल्या काही काळापासून खराब आहे. आता एशिया कपसाठी या दोघांना संघात स्थान मिळालेले नाही, ज्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.





