Ranka Jewellers : भारतीय सॉलिटेअर महोत्सवाची पुण्यात सांगता; विजेत्याला मिळाली नवी एक्सयूव्ही ७ एक्सओ कार
Ranka Jewellers : डिव्हाईन सॉलिटेयर्सच्या भारतीय सॉलिटेअर महोत्सव २०२६ ची चिंचवड येथील रांका ज्वेलर्समध्ये सांगता झाली. विजेते अमरदीप जिंदे यांना नवीन एक्सयूव्ही ७ एक्सओ कार मिळाली.

Ranka Jewellers : डिव्हाईन सॉलिटेयर्सच्या भारतीय सॉलिटेअर महोत्सव २०२६ ची पुण्यातील चिंचवड येथील रांका ज्वेलर्समध्ये बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता झाली. या महोत्सवातील बंपर बक्षीस विजेते अमरदीप जिंदे यांना नवीन एक्सयूव्ही ७ एक्सओ कारच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. देशभरातील ग्राहकांना सॉलिटेअर खरेदीचा अनुभव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाचा महोत्सव देशातील १०० हून अधिक शहरांमधील २०० हून अधिक भागीदार दागिन्यांच्या दुकानांमध्ये आयोजित करण्यात आला होता. ग्राहकांना सॉलिटेअर हिरे समजून घेण्याची आणि खरेदी करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. महोत्सवात निश्चित भेटवस्तू, साप्ताहिक भाग्यवान सोडत आणि राष्ट्रीय स्तरावरील बंपर बक्षीस अशा संधी देण्यात आल्या.
सॉलिटेअर खरेदी करताना हिऱ्यांची गुणवत्ता, प्रमाणपत्रे आणि किंमती याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळावी, यावरही भर देण्यात आला. रांका ज्वेलर्ससारख्या भागीदारांनी हा उपक्रम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
डिव्हाईन सॉलिटेयर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जिग्नेश मेहता म्हणाले, की ग्राहकांशी अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी कंपनी विविध उपक्रम राबवत असते. हा महोत्सव ग्राहक आणि विक्री भागीदारांना जोडणारा उपक्रम ठरला. महोत्सवाला प्रतिसाद दिलेल्या ग्राहकांचे आणि भागीदारांचे त्यांनी आभार मानले. भविष्यातही ग्राहकांसाठी नवीन उपक्रम राबवण्याचा कंपनीचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
रांका ज्वेलर्स, चिंचवडचे संचालक तेजपाल रांका यांनीही या महोत्सवाबाबत समाधान व्यक्त केले. डिव्हाईन सॉलिटेयर्ससोबतचे दीर्घकालीन संबंध फायदेशीर ठरल्याचे त्यांनी सांगितले. दुकानात ग्राहकांची ये-जा वाढल्याचे नमूद करत, आपल्या दुकानातील ग्राहकाला देशव्यापी महोत्सवाचे बंपर बक्षीस मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
डिव्हाईन सॉलिटेयर्सकडून सॉलिटेअर खरेदीत पारदर्शकता वाढवण्यासाठी १२३ निकषांवर आधारित गुणवत्ता हमी, प्रमाणित किंमती आणि खरेदीनंतरचे ग्राहक लाभ यांवर भर दिला जातो. धनत्रयोदशी आणि सणासुदीच्या खरेदीच्या काळात विशेष सवलती आणि आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून अधिक ग्राहकांना सॉलिटेअर खरेदीसाठी प्रोत्साहित करण्याची कंपनीची योजना आहे.
गुणवत्ता, स्पष्ट किंमत आणि ग्राहकांचा विश्वास या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून भारतातील सॉलिटेअर दागिन्यांच्या बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आगामी काळात सॉलिटेअर अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खरेदीचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत.





