Indian Royals Victory : भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा! ऋषी धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २ विकेट्सनी मारली बाजी
Indian Royals Victory : इंडियन रॉयल्स संघाने पाकिस्तान पँथर्सवर २ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

Indian Royals beats Pakistan Panthers Rishi Dhawan Fifty Asian Legends League 2026 : एशियन लीजेंड्स लीग २०२६ (Asian Legends League 2026) मधील ६ व्या सामन्यात इंडियन रॉयल्स संघाने पाकिस्तान पँथर्सवर (Indian Royals vs Pakistan Panthers) २ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील इंडियन रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. यापूर्वी त्यांनी बांगलादेश टायगर्सचा पराभव केला होता. अष्टपैलू ऋषी धवनने (Rishi Dhawan) ५० धावांची शानदार खेळी करत आणि १ विकेट्स घेत या विजयात मोलाचा वाटा उचलला.
इम्रान नझिरची ४७ धावांची झुंज!
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इंडियन रॉयल्सच्या पथ्यावर पडला. पाकिस्तान पँथर्सची सुरुवात खराब झाली; सलामीवीर मोहम्मद यासिर अवघ्या ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार इम्रान नझिरने २९ चेंडूंत ४७ धावा (६ चौकार, ३ षटकार) कुटल्या. इबरार अट्टा आणि तौफीक उमर यांनी प्रत्येकी ३९ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानने २० षटकांत ६ बाद १६७ धावा उभारल्या. भारताकडून शादाब जकाती आणि सुबोध भाटी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
The Indian Royals held their nerve in a nail-biting contest to defeat the Pakistan Panthers by 2 wickets in one of the most thrilling matches of the tournament!
Congratulations to the Indian Royals on a sensational victory! 👏💙#AsianLegendsLeague #ALLT20 pic.twitter.com/fFKv0slddJ
— Asian Legends League (@allt20official) August 2, 2026
ऋषी धवनचे अर्धशतक अन् अनुरीतचे फिनिशिंग!
First innings done… now it’s the chase that matters. 👀🔥
🎯 Target: Pakistan Panthers need 168 runs to secure the win.
Can the Panthers chase it down, or will the royals defend their total? The chase begins now! 🔥#AsianLegendsLeague #ALLT20 #CricketLegends #T20Cricket pic.twitter.com/FCB3vDWv3D
— Asian Legends League (@allt20official) August 2, 2026
प्रत्युत्तरात १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार नमन ओझा (४) पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र, अभिषेक जलोटाने ३० आणि सरुल कंवरने २९ चेंडूंत ४६ धावा ठोकल्या. त्यानंतर ऋषी धवनने ३३ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. शेवटी अनुरीत सिंहने ६ चेंडूंत नाबाद १६ धावा करत १७.४ षटकांत ८ बाद १७१ धावा उभारून भारताला २ विकेट्सने विजय मिळवून दिला.
पाकिस्तानकडून मोहम्मद इरफान, राहत अली आणि यासिर शाह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.





