चेन्नई – सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने आपल्या काही कर्जावरील व्याजदरात 0.50% पर्यंत कपात जाहीर केली आहे. बँकेने शेअर बाजारांना कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, बँकेने फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमसीएलआर 0.50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याजदर कपात सर्वच कर्जांना तात्काळ लागू करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेच्या मालमत्ता व्यवस्थापन समितीची बैठक 14 जुलैला झाली. यावेळी कर्ज व ठेवीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता अल्पकालीन कर्जावरील एमसीएलआर दर 8.25% वरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. एक महिन्याच्या कर्जावरील व्याजदर 8.40% इतका करण्यात आला आहे, जो की अगोदर 8.50% इतका होता.