YS Jagan Mohan Reddy : 3.30 लाख कोटींचे कर्ज तर घेतले; विकासाचे काय? जगन मोहन रेड्डी यांची केंद्र सरकारवर टीका
कोणतेही कल्याणकारी किंवा विकासात्मक लाभ न देताच, या सरकारने (YS Jagan Mohan Reddy) विक्रमी पातळीवर कर्ज जमा केले आहे.

YS Jagan Mohan Reddy : कोणतेही कल्याणकारी किंवा विकासात्मक लाभ न देताच, या सरकारने (YS Jagan Mohan Reddy) विक्रमी पातळीवर कर्ज जमा केले आहे. ही कर्जाची रक्कम ३.३० लाख कोटी इतकी मोठी आहे. त्यामुळे तेलुगु देशमप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार मोठा भ्रष्टाचार करत आहे, असे प्रतिपादन वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी केले आहे.
पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून ओंगोल मतदारसंघातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना जगन यांनी असा आरोप केला की, दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत सरकारने ३.३० लाख कोटी रुपयांचे कर्ज जमा केले आहे; असे असूनही, त्यांना एकही कल्याणकारी योजना राबवण्यात यश आलेले नाही. आमचे सरकार असताना आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झालेली तिजोरी आम्हाला वारशाने मिळाली होती.
त्यावेळी कोविड-१९ संकटाचा सामना करावा लागत असतानाही, आमच्या सरकारने पहिल्याच वर्षात जाहीरनाम्यातील ९९ टक्के आश्वासने पूर्ण केली होती. आम्ही जाहीरनाम्याला केवळ कागदाचा तुकडा न मानता, एक पवित्र दस्तऐवज मानले होते. जगन यांनी सध्याच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.
वाळू, दारू, ग्रॅनाइट आणि सरकारी जमिनींसारख्या संसाधनांचा वापर खाजगी फायद्यासाठी केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. (YS Jagan Mohan Reddy) जमा होणारा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा होण्याऐवजी नेत्यांच्या खिशात वळवला जात आहे. तसेच, विविध घोटाळे आणि अमली पदार्थांच्या गैरवापर प्रकरणात सहभागी असलेल्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यात अपयश आल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली.






