लंडन – भारतीय वंशाच्या युवतीवर ब्रिटनमध्ये बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील दोषी व्यक्तीला पकडण्यासाठी ब्रिटनच्या पोलिसांनी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. या महिलेवरील बलात्कारानंतर जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून दोषी व्यक्तीला पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जाऊ लागला आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांना शनिवारी संध्याकाळी वॉल्सॉलच्या पार्क हॉल परिसरात बोलावण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटिव्हीमध्ये दिसलेले संशयिताचे चित्र लोकांना दाखवले आणि या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास लगेच पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. वॉल्सॉलमध्ये वंशभेदातून बलात्काराचा बळी पडलेली तरुणी एक पंजाबी महिला आहे, असे शीख फेडरेशन यूकेने स्थानिक सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे. हल्लेखोराने ती राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला असे दिसते. गेल्या दोन महिन्यांत २० वर्षांच्या तरुणींवर गंभीर बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत आणि जबाबदार असलेल्यांना तातडीने वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी शोधण्याची गरज आहे, असे संघटनेने म्हटले आहे. तपास अधिकाऱ्यांनी काही संशयितांना अटक केली होती आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.