Tahsin Qatar Football : बापाचं अधुरं स्वप्न लेकानं केलं पूर्ण! भारतीय वंशाचा १९ वर्षीय खेळाडू कतारकडून खेळणार फिफा विश्वचषक
Tahsin Qatar Football : . भारतीय वंशाचा तहसिन मोहम्मद हा यावेळच्या फुटबॉल महाकुंभात कतारच्या २६ सदस्यीय मुख्य संघातून मैदानात उतरणार आहे.

Tahsin Mohammed Qatar FIFA World Cup 2026 : भारतासाठी फुटबॉल खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका बापाची इच्छा दुखापतीमुळे अपूर्ण राहिली, पण आज त्याच बापाच्या १९ वर्षांच्या मुलाने थेट फिफा विश्वचषकात धडक मारत इतिहास रचला आहे. भारतीय वंशाचा तहसिन मोहम्मद हा यावेळच्या फुटबॉल महाकुंभात कतारच्या २६ सदस्यीय मुख्य संघातून मैदानात उतरणार आहे. अवघा ४ वर्षांचा असताना दोहामधील लोकल स्टेडियमच्या डगआऊटमध्ये बसून वडिलांचा खेळ पाहणारा तहसिन आता जागतिक स्तरावर चमकण्यासाठी सज्ज झाला आहे. Tahsin Qatar Football
केरळ ते कतार: जमशेद थाचंकंडी यांचा संघर्ष (Tahsin Qatar Football)
मूळचे कालिकत (केरळ) येथील रहिवासी असलेले जमशेद थाचंकंडी १९९६ मध्ये पत्नी शायमासह दोहा येथे स्थायित्त्व झाले. १९९२ मध्ये जमशेद यांची ‘इंडिया युथ फुटबॉल कॅम्प’साठी निवड झाली होती, परंतु दुखापतीमुळे त्यांचे राष्ट्रीय संघाचे स्वप्न भंगले. कतारमध्ये लाकडाचा व्यवसाय करताना ते दर शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी सहकाऱ्यांसोबत स्थानिक मैदानावर फुटबॉल खेळायचे. त्यांचा लहान मुलगा तहसिन डगआऊटमध्ये बसून हा खेळ पाहायचा आणि तिथूनच त्याचे फुटबॉलचे धडे सुरू झाले. ३० वर्षांनंतर आज मुलाने वडिलांचे ते स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, २००६ मध्ये विकास धोरासू फ्रान्सकडून खेळल्यानंतर फिफा विश्वचषकात स्थान मिळवणारा तहसिन हा पहिलाच भारतीय वंशाचा खेळाडू ठरला आहे.
एस्पायर अकॅडमी ते कतर सीनियर टीमचा प्रवास – (Tahsin Qatar Football)
Four Indian-origin players to feature at WC
Tahsin Mohammed Jamshid is part of Qatar’s 26-member squad; Sarpreet Singh included in New Zealand WC squad @kripatistic gets you more pic.twitter.com/FQ5JOcFLGs
— WION (@WIONews) June 4, 2026
तहसिनने २०१७ मध्ये अल-दुहैल एससीच्या सब-जूनियर संघातून सुरुवात केली. त्यानंतर कतारच्या एलिट ‘एस्पायर अकॅडमी’मध्ये त्याची निवड झाली. फॉरवर्ड आणि विंगर म्हणून खेळणाऱ्या तहसिनने २०२३ मध्ये कतारच्या अंडर-१७ संघातून पदार्पण केले. २०२४ मध्ये त्याने कतार स्टार्स लीगमध्ये सीनियर प्रोफेशनल पदार्पण केले. सप्टेंबर २०२४ मध्ये अवघ्या १७ वर्षे ११ महिने वयाचा असताना त्याने अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषक क्वालिफायरमध्ये कतारच्या सीनियर संघात पदार्पण केले. या मोहिमेत कतारने भारताचाही सामना केला होता, जो ०-० असा बरोबरीत सुटला आणि जमशेद स्वतः स्टँडमध्ये उपस्थित होते.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फॅन; १३ जूनला पहिली मॅच! (Tahsin Qatar Football)
India may not be at #FIFAWorldCup2026, but Indian roots will be!
🇳🇿 Sarpreet Singh (New Zealand)
🇨🇩 Samuel Moutoussamy (DR Congo)
🇦🇺 Nishan Velupillay (Australia)
🇶🇦 Tahsin Mohammed Jamshid (Qatar)
4 players. 4 countries. 1 Indian connection#WorldCup2026 #IndianDiaspora #FIFA pic.twitter.com/Rq1lyczGKt— Towards Public Policy (@ThePublicPolicy) June 4, 2026
पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (cristiano ronaldo ) मोठा फॅन असलेला तहसिन २०२२ चा विश्वचषक कतारमध्ये प्रेक्षक म्हणून पाहत होता, पण यंदा तो स्वतः मैदानावर असेल. जुलियन लोपेटेगुई यांच्या मार्गदर्शनाखालील कतार संघ १३ जून रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे स्वित्झर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळेल. त्यानंतर त्यांचा सामना कॅनडा आणि बोस्निया-हेरझगोव्हिनाशी होईल. ऑक्टोबरमध्ये यूएईला २-१ ने पराभूत करून कतारने फिफा विश्वचषक २०२६ साठी पात्रता (क्वालिफाय) मिळवली आहे.




