Nepal : नेपाळमधील बागमती नदी बुडून भारतीय व्यक्तीचा मृत्यू
Nepal – नेपाळमधील बागमती नदीत बुडून एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तराई पठाराच्या दक्षिणेकडील जलसिंचन प्रकल्पाच्या कालव्यामधून या व्यक्तीचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला.
रोहित कुमार सिह असे या भारतीय युवकाचे नाव असून तो मूळचा बिहारमधील खागरिया जिल्ह्यातील रहिवासी होता. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो मद्यसेवन केलेल्या अवस्थेमध्ये बागमती नदीमध्ये अंघोळीला उतरला होता. मात्र थोड्याच वेळात तो बेपत्ता झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाच्या आपत्ती प्रतिसाद विभागाच्या संयुक्त बचाव पथकाला सिंह याचा मृतदेह रविवारी सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास गुजरा महापालिकेच्या हद्दीत बागमती जलसिंचन कालव्यामध्ये सापडला, असे रोहूहात पोलीस उप अधिक्षक जीपक कुमार राय यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर सिंह याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.





