Durand Cup | ड्युरॅंड करंडक गोवा संघाने जिंकला
Updated On:

पणजी – भारतीय फुटबॉल जगतातील अत्यंत जुनी पण प्रतिष्ठित स्पर्धा अशी ओळख असलेली ड्युरॅंड करंडक स्पर्धा गोवा फुटबॉल क्लबने (एफसी गोवा) जिंकली. अंतिम सामन्यात गोवा संघाने कोलकातातील प्रसिद्ध मोहमेडन स्पोर्टिंग क्लबला 1-0 असे पराभूत करत विजेतेपद मिळवले.
गोवा संघाचा कर्णधार एदू बेदियाने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यंदाच्या वर्षी होत असलेल्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) तयारीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
गट फेरी तसेच बाद फेरीतील एकही सामना न गमावता गोवा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरी केली.
अतिरिक्त वेळेच्या 15 व्या मिनिटाला बेदिया याने गोल करत संघाचा विजय साकार केला. प्रशिक्षक जुआन फेरान्डो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोव्याचे पहिलेच मोठे विजेतेपद आहे.





