IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीनंतर टीम इंडियाच्या दोन्ही संघांनी किंग चार्ल्स तिसरे यांची घेतली भेट, काय झाली चर्चा? जाणून घ्या

IND vs ENG Indian Cricket Teams meet Britain’s King Charles III : भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचे खेळाडू लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचे किंग चार्ल्स तिसरे यांची सेंट जेम्स पॅलेस येथे भेट घेतली. भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. या मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे. लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला.
या खास भेटीत कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील यावेळी हजर होते. किंग चार्ल्स तिसरा यांच्यासोबत भेटीनंतर खेळाडूंनी त्यांच्यासोबत फोटो सेशनही केले.
#WATCH | The United Kingdom: King Charles III pose with the players of the Indian Men’s and Women’s Cricket team, the coach, staff members and BCCI officials, at St. James’s Palace in London. pic.twitter.com/YRhQPcXvuw
— ANI (@ANI) July 15, 2025
किंग चार्ल्स यांच्या भेटीबद्दल गिल काय म्हणाला?
#WATCH | London, UK | On meeting King Charles III, Team India skipper Shubman Gill says, “It was amazing to meet King Charles III and he was very kind and generous to call us. We had some really good conversations. King Charles III told us that the way our last batsman got out in… pic.twitter.com/M1Us18svHt
— ANI (@ANI) July 15, 2025
किंग चार्ल्स यांना भेटल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू खूप आनंदी दिसले. त्यांनी सांगितले की, किंग चार्ल्स यांच्याशी त्यांची काय चर्चा झाली. या खास प्रसंगी कर्णधार गिल म्हणाला, “किंग चार्ल्स तिसरा यांनी आम्हाला बोलावले, हा आमच्यासाठी सन्मान आहे. किंग चार्ल्स यांनी आम्हाला सांगितले की, लॉर्ड्स कसोटीत आमचा शेवटचा फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाला, ते दुर्दैवी होते. आम्हीही सांगितले की, तो सामना आमच्या नशिबाने हातातून निसटला, पण पुढील सामन्यांमध्ये नशीब आमची साथ देईल, अशी आशा आहे.”
हेही वाचा – IND vs ENG : लढवय्या रवींद्र जडेजाचा मोठा पराक्रम; जागतिक क्रिकेटमध्ये ठरला केवळ चौथाच खेळाडू!
हरमनप्रीत कौरने काय दिली प्रतिक्रिया?
#WATCH | London, UK | On meeting King Charles III, India women’s cricket team captain Harmanpreet Kaur says, “It was a very nice experience meeting King Charles III. This was our first time meeting him and he was very friendly…”
She further says, “We have been playing good… pic.twitter.com/Iab65MXXKc
— ANI (@ANI) July 15, 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “किंग चार्ल्स यांना भेटण्याचा अनुभव खूप खास होता. ही आमची त्यांच्याशी पहिलीच भेट होती आणि ते खूपच मैत्रीपूर्ण स्वभावाचे आहेत,” असे तिने सांगितले. ती पुढे म्हणाली, “आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत आणि आम्हाला स्वतःला सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळत आहेत.”
हेही वाचा – Yash Dayal Case : ‘पाच वर्षे कोणी मूर्ख बनू शकत नाही…’, यश दयालला लैंगिक शोषण प्रकरणात कोर्टाचा दिलासा
राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया –
#WATCH | London, UK | On the Lord’s #INDvsENGTest | BCCI vice president Rajeev Shukla says, “We had a discussion with the King regarding the Lord’s test match…The King said that the dismissal of Mohammed Siraj was very unfortunate; otherwise, India could have won the… pic.twitter.com/uUjEpMndMo
— ANI (@ANI) July 15, 2025
या प्रसंगी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, “किंग चार्ल्स यांनी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना भेटण्यासाठी आमंत्रित केले होते. हा एक ऐतिहासिक क्षण होता. खेळाडू त्यांना भेटून खूप आनंदी झाले. किंग चार्ल्स यांनी मला मी त्यांना दिलेल्या पुस्तकाबद्दल विचारले. त्यांनी भारतीय क्रिकेटपटू आकाशदीप याच्या बहिणीच्या प्रकृतीबद्दलही विचारणा केली, जी सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे.” तसेच त्यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.





