Plane Crash : मोठी दुर्घटना..! भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, घटनेनं देश हळहळला
Plane Crash : भारतीय हवाई दलाच्या (IAF) 'AN-32' या लष्करी मालवाहू विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला आहे.

Plane Crash : आसाममधील जोरहाट येथे भारतीय हवाई दलाच्या (IAF) AN-32 मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत हवाई दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. लँडिंगदरम्यान झालेल्या या अपघातात सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. (Plane Crash)
या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे पाच जवान शहीद झाले. स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय हवाई दलाने या सर्व शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, या दुःखाच्या प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे. (Plane Crash)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (13 जून) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास जोरहाटमधील रोरियाह (Rowriah) हवाई तळावर 43व्या स्क्वॉड्रनचे AN-32 विमान नियमित उड्डाणानंतर लँडिंग करत असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याला भीषण आग लागली. अग्निशमन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Plane Crash)
भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेत पाच जवानांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. या अपघातात सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दुर्घटनेचे कारण निश्चित करण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Plane Crash)

Plane Crash : मोठी दुर्घटना..! भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, घटनेनं देश हळहळला
AN-32 हे सोव्हिएत (रशियन) बनावटीचे दोन इंजिन असलेले लष्करी मालवाहू विमान असून ईशान्य भारत, हिमालयीन सीमाभाग आणि दुर्गम भागांमध्ये रसद, जवान आणि साहित्य वाहतुकीसाठी भारतीय हवाई दल अनेक दशकांपासून या विमानांचा वापर करत आहे. (Plane Crash)
दरम्यान, AN-32 विमानांशी संबंधित यापूर्वीही काही मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. 2019 मध्ये जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील मेचुकाकडे जाणारे AN-32 विमान बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्याचे अवशेष सापडले आणि त्यातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच 2016 मध्ये चेन्नईहून पोर्ट ब्लेअरकडे जाणारे AN-32 विमान बंगालच्या उपसागरावर बेपत्ता झाले होते. (Plane Crash)





