Asia Cup: भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी, पहिल्याच अंडर-19 आशिया कप स्पर्धेवर कोरले नाव

U19 Women’s T20 Asia Cup 2024: भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशच्या महिला संघाचा पराभव करत अंडर-19 आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने 41 धावांनी बांगलादेशच्या संघाचा पराभव केला. भारताच्या विजयात गांगोडी त्रिशाने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने 47 बॉलमध्ये 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
पुरुषांच्या अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला बांगलादेशकडूनच पराभवाचा सामना कराव लागला होता. आता या पराभवाचा वचपा काढत महिलांच्या पहिल्या वहिल्या अंडर-19 आशिया कप स्पर्धेवर भारतीय संघाने नाव कोरले आहे.
View this post on Instagram
या सामन्यात भारताने पहिल्यांदा बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावत 117 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 76 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सलामीला आलेल्या 47 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने मदतीने 52 धावांची खेळी केली. निक्की प्रसादने 12, मिथिला विनोदने 17, आयुषी शुक्लाने 10 धावा केल्या. बांगलादेशकडून फर्जना इसमिनने 4 विकेट्स घेतल्या
धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेला बांगलादेश संघाची सुरूवात खास झाली नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्यांनी पहिली विकेट गमावली. बांगलादेशकडून जुएरिया फिरदौसने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. बांगलादेश संघाला फक्त 76 धावांपर्यंतच मजल मारता आली व भारतीय संघाने 41 धावांनी सामना जिंकत विजेतेपदावर नाव कोरले. भारताकडून आयुषी शुक्लाने 3, पारूनिका सिसोदिया आणि सोनम यादवने प्रत्येकी 2 व व्हीजे जोशिताने 1 विकेट घेतली.





