IND vs ZIM 3rd T20 : टीम इंडियानं झिम्बाब्वेविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार गिलनं घेतला ‘हा’ निर्णय….

IND vs ZIM 3rd T20 (Toss Update) : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाचा मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
तत्पूर्वी झालेला नाणेफकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झिम्बाब्वे संघ क्षेत्ररक्षणासाठी प्रथम मैदानात उतरेल.
India won the toss and opted to bat in the third #ZIMvIND T20I 🏏 pic.twitter.com/pF0zHnDLI1
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 10, 2024
दरम्यान, या मालिकेतीलहा आजचा तिसरा सामना असून भारतानं आघाडी घेतली तर झिब्वाब्वे संघावर दडपण येईल. त्यामुळे मालिका विजयाचीही संधी भारतीय संघासमोर उभी राहील. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती त्यामुळे झिम्बाब्वेने टी-20 मालिकेतील पहिला सामना सहज जिंकला होता.
मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाने हा सामना 100 धावांनी जिंकला होता. अभिषेक शर्माने स्फोटक कामगिरी करत भारताकडून शतक झळकावले. आता झिम्बाब्वेचा संघ नव्या रणनीतीने मैदानात उतरू शकतो. सिकंदर रझा कर्णधार असलेल्या संघासाठी तिसरा सामना आव्हानात्मक असू शकतो.





