India Vs Pak : पाकिस्तानला आणखी एक झटका ! ज्याच्या भरवश्यावर बसले त्यानेच दिला दगा…

भारतातील जम्मूमधील पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. तसेच यादरम्यान भारताने सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले, एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद केली. तसेच आयात, निर्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला.
सिंधू नदीच्या जल वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला होता. पाकिस्तानकडून इशाराही देण्यात आला, मात्र भारत त्यांच्या इशाऱ्याला जुमानला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली, त्यानंतर पाकिस्तानला असं वाटत होतं की भारताच्या या निर्णयामध्ये वर्ल्ड बँक हस्तक्षेप करेल मात्र जागतिक बँकेनं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची उरलीसुरली आशादेखील मावळली.
काय म्हणाली वर्ल्ड बँक?
जागतिक बँकेनं या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, आम्ही भारताला निर्णय घेण्यापासून रोखू शकत नाही, या प्रकरणात आमची कोणतीही भूमिका नाही, त्यामुळे आम्ही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत, वर्ल्ड बँकेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.





