India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरमध्ये खेळवला जात आहे. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांना कोणतीही मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि सामन्याच्या चौथ्या दिवशी संपूर्ण संघ पहिल्या डावात 233 धावांवरच आटोपला. बांगलादेशकडून मोमिनुल हकने दमदार कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. मोमिनुलने 194 चेंडूंचा सामना करत नाबाद 107 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 3 बळी घेतले. सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय… पहिल्या दिवशी खराब प्रकाशामुळे दीड सत्राचाच खेळ होऊ शकला. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. चौथ्या दिवशी मात्र पाऊस थांबला आणि खेळास सुरूवात झाली. बांगलादेशने 3 बाद 107 धावसंख्येवरून पुढे सुरुवात केली. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर झाकीर हसन शून्यावर बाद झाला. तर शादमान इस्लाम 24, कर्णधार नजमुल हुसेन शांतो 31 आणि मुशफिकर रहीम 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 32 चेंडूंचा सामना करत 2 चौकार मारले. शाकिब अल हसन 9 धावा करून बाद झाला. तर मेहदी हसन मिराज 20 धावा करून बाद झाला. त्याने 42 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार मारले. मोमिनुलने झळकावले दमदार शतक….. मोमिनुल दमदार कामगिरी करत शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 194 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या. मोमिनुलने या कालावधीत 17 चौकार आणि एक षटकार मारला. हसन मोहम्मद 1 धावा करून तर खालिद अहमद शून्यावर बाद झाला. जडेजाने खालिद अहमदला बाद करून बांगलादेशचा डाव संपवला आणि त्याचे 300 कसोटी बळी पूर्ण केले. ENG vs AUS 5th ODI : हेडची अष्टपैलू कामगिरी, इंग्लंडला नमवून ऑस्ट्रेलियानं मालिकेवर केला कब्जा.. भारतासाठी बुमराह-सिराजची दमदार कामगिरी… बुमराहने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 18 षटकात 50 धावा देत 3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आणि आकाश दीप यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले. याव्यतिरिक्त फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 15 षटकात 45 धावा देत 2 तर रवींद्र जडेजाने 9.2 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.