IND vs BAN : बांगलादेशचा संघ भारतात दाखल, ‘या’ तारखेला चेन्नईत होणार पहिला कसोटी सामना…

India vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकली. या मालिकेत बांगलादेशसाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. आता बांगलादेश संघाला भारताविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर त्यांचे मनोबल उंचावले असून बांगलादेशचा संघ भारताविरूध्दच्या पहिल्या कसोटीसाठी रविवारी दुपारी चेन्नईला पोहोचला आहे..
दोन्ही संघांमधील दोन कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवला जाणार आहे. जिथे खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. ढाका येथून चेन्नईला रवाना होण्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतो याने विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “भारताविरूध्दची कसोटी मालिका आमच्यासाठी निश्चितच आव्हानात्मक असेल. एका चांगल्या मालिकेनंतर (वि. पाकिस्तान) संघाचा आणि देशातील लोकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे”
पुढे तो म्हणाला की, “प्रत्येक मालिका ही संधी असते. आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठी खेळू. त्यांचा संघ क्रमवारीत आमच्यापेक्षा खूप पुढे आहे पण आम्ही अलीकडे चांगली कामगिरी केली आहे. पाकविरूध्दची आमची मालिका चांगली झाली आहे. पाच दिवस चांगले खेळण्याचे आमचे ध्येय असेल.”
Bangladesh Team arrive in Chennai for the first Test of their ICC WTC series against India.#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/wBwapu3jep
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 15, 2024
भारतीय संघ अव्वल स्थानावर….
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी 68.52 आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. संघाने 6 सामने खेळले, तीन जिंकले आणि तीन सामने गमावले. त्यांची गुणांची टक्केवारी 45.83 आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.
हेड-टू-हेड रेकाॅर्ड….
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 11 भारताने जिंकले आहेत. तर 2 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशचा संघ आजपर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही.
Duleep Trophy 2024 : श्रेयस अय्यरच्या संघाचा सलग दुसरा पराभव, भारत ‘अ’ संघ ठरला विजयी…
बांगलादेश क्रिकेट संघ : नजमुल शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी मिराज, जाकर अली अनिक, तस्कीन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमूदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.





