Duleep Trophy 2024 ( IND-A vs IND-D): सध्या देशात 2024 दुलीप ट्रॉफीची चर्चा आहे. वास्तविक, या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेटचे अनेक सुपरस्टार खेळत आहेत. दुलीप ट्रॉफीची दुसरी फेरी 12 सप्टेंबरपासून खेळवली गेली. त्यामध्ये पुन्हा एकदा श्रेयस अय्यरचा भारत ‘ड’ संघ पराभूत झाला आहे. तर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला श्रेयस अय्यर फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याचे कसोटी संघात पुनरागमन करणे अधिक कठीण झाले आहे.
दुलीप ट्रॉफी 2024मध्ये भारताचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला. त्यांच्या संघाचा भारत ‘अ’ संघाने 186 धावांनी पराभव केला. विजेत्या भारत ‘अ’ संघाची कमान मयंक अग्रवालच्या हाती आहे.
श्रेयस अय्यरची निराशाजनक कामगिरी…
दरम्यान, असे अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत, जे भविष्यात टीम इंडियाचे सुपरस्टार असतील. सध्या जर आपण श्रेयस अय्यरबद्दल बोललो तर तो भारत ‘ड’ संघासाठी पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सातव्या चेंडूवर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने आकिब खानच्या हाती झेलबाद केले. तर दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळायला आला. यावेळी त्याने 55 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या पण संघाच्या विजयासाठी त्या पुरेशा ठरल्या नाहीत. या वेळी अय्यरला शम्स मुलानीने बाद केले.
संजू सॅमसनही मोठी खेळी करण्यात ठरला अपयशी…
यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हा देखील श्रेयस अय्यरच्या संघाचा एक भाग होता. मोठा डाव खेळण्यातही तो अपयशी ठरला. सॅमसनने पहिल्या डावात केवळ पाच धावा तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून 45 चेंडूत 40 धावा आल्या. यादरम्यान सॅमसनने 3 चौकार आणि 3 षटकार मारले.
Duleep Trophy 2024 : ऋतुराज ठरला श्रेयसवर भारी; भारत ‘क’ संघाचा ‘ड’ संघावर दणदणीत विजय…
असा झाला सामना…
या सामन्यात भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात 290 धावा केल्या होत्या. अष्टपैलू शम्स मुलाणीने संघाकडून सर्वाधिक 89 धावांची खेळी खेळली. तनुष कोटियनने आठव्या क्रमांकावर 53 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत ‘ड’ संघ पहिल्या डावात केवळ 183 धावा करू शकला. खलील अहमद आणि आकिब खान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
𝐕𝐢𝐜𝐭𝐨𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐀! 👏
They bowl India D out for 301 to win by 186 runs 👌👌
4⃣wickets for Tanush Kotian
3⃣ wickets for Shams Mulani
1⃣ wicket each for Khaleel Ahmed & Riyan Parag#DuleepTrophy | @IDFCFIRSTBankScorecard ▶️: https://t.co/m9YW0HttaH pic.twitter.com/ZSa4eZLJMs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2024
भारत ‘अ’ संघाने दुसरा डाव 3 बाद 380 धावांवर घोषित करत भारत ‘ड’ समोर 488 धावांचे लक्ष्य ठेवलं होते. यादरम्यान प्रथम सिंग(122) आणि तिलक वर्मा (नाबाद 111) यांनी शतके झळकावली. प्रत्युत्तरात भारत ‘ड’ संघ 301 धावांवर सर्वबाद झाला. भारत ‘ड’ संघाकडून दुसऱ्या डावात रिकी भुई याने सर्वाधिक 113 धावांची खेळी केली तर भारत ‘अ’ कडून दुसऱ्या डावात शम्स मुलाणीने तीन तर कोटियनने सर्वाधिक चार गडी बाद केले.