Team India Schedule : इंग्लंडचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता टीम इंडियाच्या निशाण्यावर कोण? जाणून घ्या पुढचं शेड्युल

Team India Schedule : नुकतीच भारतीय क्रिकेट टीम आणि इंग्लंड क्रिकेट यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका (Team India Schedule) पार पडली. युवा कॅप्टन शुभमन गिलच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाला दोन रोमांचक विजय मिळाले. नव्या दमाच्या खेळाडूंसह टीम इंडिया इंग्लड दौऱ्यावर गेली होती त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडसमोर किती तग धरेल याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र नव्या छाव्यांनी दम दाखवला आणि रोहित आणि विराटची कमतरता भरून काढली. इंग्लंडचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता टीम इंडियाचे पुढील शेड्युल (Team India Schedule) कसे असेल? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
आशिया कप 2025
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आशिया कप खेळणार आहे. आशिया कपला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक कसोटीपटूंना आशिया कपमधून विश्रांती देण्यात येणार आहे. हे सगळे सामने UAE मध्ये पार पडणार आहेत.
वेस्ट इंडिज टेस्ट सिरीज
ऑक्टोबरमध्ये भारत पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरेल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजविरुद्ध आयोजन करण्यात आलं आहे. हे सामने अहमदाबाद आणि दिल्ली येथे होतील, ज्यामुळे भारताच्या पुढील WTC सायकल मोहिमेची सुरुवात होईल. 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे पहिला सामना होणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे दुसरा कसोटी सामना पार पडणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा 2025
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांनंतर, भारत तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली राष्ट्रीय संघात पुनरागमन करतील.
कधी आणि कुठे होणार सामना?
१९ ऑक्टोबर – पहिला एकदिवसीय सामना (पर्थ)
२३ ऑक्टोबर – दुसरा एकदिवसीय सामना (अॅडलेड)
२५ ऑक्टोबर – तिसरा एकदिवसीय सामना (सिडनी)
२९ ऑक्टोबर – पहिला टी२० सामना (कॅनबेरा)
३१ ऑक्टोबर – दुसरा टी२० सामना (मेलबर्न)
०२ नोव्हेंबर – तिसरा टी२० सामना (होबार्ट)
०६ नोव्हेंबर – चौथा टी२० सामना (गोल्ड कोस्ट)
०८ नोव्हेंबर – पाचवा टी२० सामना (ब्रिस्बेन)
साऊथ अफ्रिकेचा भारत दौरा 2025
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळेल. दक्षिण आफ्रिकेतील संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळतील. ही मालिका जवळपास महिनाभर चालणार आहे.
साऊथ अफ्रिकेच्या दौऱ्याचे वेळापत्रक
१४ नोव्हेंबर – पहिली कसोटी (कोलकाता)
२२ नोव्हेंबर – दुसरी कसोटी (गुवाहाटी)
३० नोव्हेंबर – पहिला एकदिवसीय सामना (रांची)
३ डिसेंबर – दुसरा एकदिवसीय सामना (रायपूर)
६ डिसेंबर – तिसरा एकदिवसीय सामना (विशाखापट्टणम)
९ डिसेंबर – पहिला टी२० सामना (कटक)
११ डिसेंबर – दुसरा टी२० सामना (मुल्लानपूर)
१४ डिसेंबर – तिसरा टी२० सामना (धर्मशाळा)
१७ डिसेंबर – चौथा टी२० सामना (लखनऊ)
१९ डिसेंबर – पाचवा टी२० सामना (अहमदाबाद)





