IND vs AUS 1st Test : शुभमन गिलच्या दुखापतीबाबत BCCIने दिले अपडेट; जाणून घ्या, मैदानात कधी परतणार..

Shubman Gill Injury Update : टीम इंडियाचा अनुभवी आणि प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल पर्थ कसोटीचा भाग नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. गिल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे.
सामन्यापूर्वी सराव करताना शुभमनला अंगठ्याला दुखापत झाली होती.जसप्रीत बुमराह पर्थ कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने नाणेफेकीनंतर गिलच्या दुखापतीबाबत अपडेट शेअर केले आहे.
एक्सवर लिहिले आहे की,”डब्ल्यूएसीए येथे सिम्युलेशन सामनाच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या निवडीसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दररोज त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.”
UPDATE: Shubman Gill sustained a left thumb injury during Day 2 of match simulation at The WACA. He was not considered for selection for the first Test of the Border-Gavaskar Trophy.
The BCCI Medical Team is monitoring his progress on a daily basis.#TeamIndia | #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
गिलच्या दुखापतीनंतर त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तसे नाही. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून गिल मैदानात परतू शकतो. मात्र, त्याच्या परतण्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील पर्थ कसोटीचा भाग नाही. त्याची पत्नी रितिका सजदेहने अलीकडेच एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे रोहित कुटुंबासोबत आहे. दुसऱ्या कसोटीतूनही तो मैदानात परतू शकतो. दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळवली जाईल.





