India U19 Squad : आशिया कपसाठी भारताचा संघ जाहीर! मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, वैभव सूर्यवंशीला मिळाली संधी

त्यामुळे भारतीय संघाचा युवा स्टार हा पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. आशिया कप ‘रायझिंग स्टार’ स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवल्यानंतर वैभव आता आगामी अंडर-१९ एशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाचा हा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.
कर्णधार आणि उप-कर्णधार
🚨 NEWS 🚨
India’s U19 Squad for ACC Men’s U19 Asia Cup announced.
The Junior Cricket Committee has picked the India U19 squad for the upcoming ACC Men’s U19 Asia Cup to take place in Dubai from 12th December.
Details 🔽 https://t.co/NQS4ihS8hn
— BCCI (@BCCI) November 28, 2025
या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात सध्या सर्वात लोकप्रिय नाव १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याचे आहे. मात्र, संघाची कमान १७ वर्षीय आयुष म्हात्रेकडे देण्यात आली आहे. आयुषने याच वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर अंडर-१९ संघाचे यशस्वी नेतृत्व केले होते. तर, विहान मल्होत्रा याची उप-कर्णधार म्हणून निवड झाली आहे. या स्पर्धेला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
हेही वाचा – MS Dhoni Dinner : धोनीकडून विराटचा खास पाहुणचार! डिनरनंतर ‘माही’ने स्वतः कोहलीला हॉटेलवर सोडले, पाहा VIDEO
वैभवची कामगिरी आणि अपेक्षा –
या स्क्वॉडचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विस्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी. त्याने यापूर्वीच जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर छाप पाडली आहे. इंग्लंड दौऱ्यावर वैभवने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत पुरुषांच्या यूथ वनडेमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा फलंदाज बनण्याचा विक्रम केला होता. वैभवने तेव्हा फक्त ५२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. आता आशिया कपमध्येही तो सलामीची जबाबदारी सांभाळत संघाला वेगवान सुरुवात करून देईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक
भारताचा अंडर-१९ संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उप-कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंह, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, नमन पुष्पक, डी दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह (फिटनेसवर अवलंबून), उद्धव मोहन आणि ऐरन जॉर्ज. राखीव खेळाडू: राहुल कुमार, हेमचुदेषन जे, बीके किशोर, आदित्य रावत.





