Samit Dravid : ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडचा मुलगा समितला मिळाली संधी…

India U19 squad for australia multi format series :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा या संघात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक, समितचा भारताच्या अंडर-19 संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय अंडर-19 संघाला ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघाविरुद्ध एकदिवसीय आणि चार दिवसीय सामने खेळायचे आहेत. या दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी समितला टीम इंडियात संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 मालिका 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
ज्युनियर निवड समितीने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्ध आगामी बहु-स्वरूप IDFC FIRST बँक होम सीरिजसाठी भारताच्या अंडर-19 संघाची निवड केली आहे. या मालिकेत पुद्दुचेरी आणि चेन्नईमध्ये तीन 50 षटकांचे सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील.
यूपीचा स्टार फलंदाज मोहम्मद अमानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, चार दिवसीय दोन सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
🚨 NEWS 🚨
India U19 squad and fixtures announced for multi-format home series against Australia U19.
Squad for one-day series: Rudra Patel (VC) (GCA), Sahil Parakh (MAHCA), Kartikeya KP (KSCA), Mohd Amaan (C) (UPCA), Kiran Chormale (MAHCA), Abhigyan Kundu (WK) (MCA), Harvansh…
— BCCI (@BCCI) August 31, 2024
समितबद्दल बोलायचे तर तो नुकताच महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये खेळला. भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा देखील क्रिकेटचा शौकीन आहे आणि तो स्व:ला अष्टपैलू खेळाडू सिद्ध करण्याच्या मार्गावर आहे. समित द्रविड देशांतर्गत स्तरावर धावा करत आहे. अलीकडेच, महाराजा केएससीए टी-20 ट्रॉफीमधील त्याच्या काही मोठ्या शॉट्सचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. समितने म्हैसूर वॉरियर्सकडून 7 डावात अनुक्रमे 7, 7, 33, 16, 02, 12 आणि 05 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ – रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यूके), हरवंशसिंग पनगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन. निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन
ENG vs SL 2nd Test : लॉर्ड्सवर शतक झळकावत रूटने रचला इतिहास, ॲलिस्टर कूकचा मोडला विक्रम…
चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी संघ – वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पानगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन.





