India – Sri Lanka : भारत श्रीलंका मैत्रीपूर्ण सांस्कृतिक आदानप्रदान दौऱ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

पुणे : भारत श्रीलंका मैत्रीपूर्ण सांस्कृतिक आदानप्रदान दौऱ्यानिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २० व गुरूवार २१ या दोन दिवसांदरम्यान भांडारकर रिसर्च ओरियंटल इन्स्टिट्यूटमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इंडिया आणि सुबुद्धी लिटरेचर सर्कल श्रीलंका व लोकमान्य सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार, २० रोजी झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली भांडारकर प्राच्य विद्या संस्थेमध्ये श्रीलंका येथील विविध विद्यापीठामधील ११ प्राध्यापकांनी अभ्यास दौरा आणि विचारांचे आदानप्रदान केले. यावेळी भूपाल पटवर्धन, सुधीर वैशंपायन, सुशील जाधव, प्रदीप दादा रावत, श्रीनिवास कुलकर्णी, मुकुल मारणे, चिन्मय भंडारी, ज्ञानेश्वर मुळे आणि श्रीलंका येथील विविध विद्यापीठामधील विविध मान्यवर प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमामध्ये नीलकंठ प्रकाशन प्रकाशित “युगुल” या श्री. अनंत पाठक लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. तसेच या कार्यक्रमामध्ये भांडारकर संस्थेमधून श्री. चिन्मय भंडारी यांनी संस्थेविषयी माहिती, भारतीय संस्कृतीबद्दल चित्रफीत सादर करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी गुरूवार, २१ रोजी सायंकाळी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात होते. या मध्ये लहेजा स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस् तर्फे गणेश वंदना, भांडारकर संस्थेचे अभ्यासक श्री. बहुलीकर यांचे व्याख्यान आणि कल्याणी देशपांडे यांचे सतार वादन केले, समीर पुणतांबेकर यांनी त्यांना तबल्यावर साथ संगत केली.
त्यानंतर सायंकाळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इंडिया आणि सुबुद्धी लिटरेचर सर्कल श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द पोएट्री रेन ऑफ भारत’ हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला लोकमान्य सोसायटी, पुणे विभागाचे प्रमुख सुशील जाधव यांच्या हस्ते पाहुणे व श्रीलकंन कवींचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. तर लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्या वतीने मुकुल मारणे यांनी सर्वांचे स्वागत केले.





