India Slams PAK on UNSC। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्या टिप्पण्यांना भारताने योग्य उत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी, “एकीकडे भारत एक परिपक्व लोकशाही, उदयोन्मुख अर्थव्यवस्था, बहुलवादी आणि समावेशक समाज आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान कट्टरतावाद आणि दहशतवादात बुडालेला आहे आणि जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून सतत कर्ज घेत आहे.” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. पी. हरीश यांनी, “आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करताना, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की काही मूलभूत तत्त्वे आहेत ज्यांचा सार्वत्रिकपणे आदर केला पाहिजे, त्यापैकी एक म्हणजे दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता. परिषदेच्या कोणत्याही सदस्याने अशा वर्तनात सहभागी होऊन उपदेश करणे योग्य नाही, जे आंतरराष्ट्रीय समुदायाला पूर्णपणे अस्वीकार्य आहे.” युद्धबंदीच्या मुद्द्याबाबत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काय म्हटले? India Slams PAK on UNSC। युद्धबंदीबाबत पी. हरीश यांनी, “ऑपरेशन सिंदूरच्या प्राथमिक उद्दिष्टांच्या साध्य झाल्यानंतर, पाकिस्तानच्या आवाहनावरून थेट लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यावरील खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीर आणि सिंधू पाणी करारावर पाकिस्तानला फटकारले India Slams PAK on UNSC। इशाक दार यांच्या प्रश्नावर राजदूत पी. हरीश यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत भारत देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही प्रयत्न कधीही स्वीकारणार नाही. पाकिस्तानने काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सिंधू पाणी कराराचा उल्लेख करण्याला तीव्र विरोध व्यक्त करताना पी. हरीश म्हणाले की दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या मुद्द्यांवर पाकिस्तानचे दुटप्पी वर्तन निषेधार्ह आहे.” असे म्हणत पाकिस्तानवर निशाणा साधला.