India Semifinal Scenarios : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढत; नेमकं सेमीफायनलचं समीकरण काय? जाणून घ्या
India Semifinal Scenarios : बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये (बाद फेरी) जागा पक्की करण्यासाठी 'करो या मरो'ची स्थिती निर्माण झाली आहे.

IND W vs AUS W India Semifinal Scenarios : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा सामना २८ जून रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणार आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये (बाद फेरी) जागा पक्की करण्यासाठी ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या अटीतटीच्या बनलेल्या ग्रुप ‘ए’ च्या गुणतालिकेत भारतीय संघ ४ सामन्यांत ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचेही ६ गुण आहेत. मात्र, सरस नेट रनरेटमुळे (NRR) भारत सध्या पुढे आहे. अशा स्थितीत भारताला हा सामना केवळ जिंकायचाच नाही, तर रनरेटचे गणितही सांभाळावे लागणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, लॉर्ड्सचे मैदान सुरुवातीला फलंदाजीसाठी पूरक असू शकते.
लॉर्ड्सच्या मैदानावर फिरकीपटू ठरणार ‘एक्स फॅक्टर’ –
Manchester ⏩ London 📍
Travel day smiles & dialled-in focus as #TeamIndia heads to the capital for a blockbuster game against Australia ⏳#WomenInBlue | #T20WorldCup | #AUSvIND pic.twitter.com/otQGiNCM8L
— BCCI Women (@BCCIWomen) June 27, 2026
स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी २:३० वाजता सुरू होणार असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल. खेळ जसजसा पुढे जाईल, तशी खेळपट्टी संथ होत जाईल आणि फिरकीपटूंना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५० च्या आसपास आहे, जी दुसऱ्या डावात १३० पर्यंत घसरते. विशेष म्हणजे, भारतीय महिला संघ लॉर्ड्सवरआपला पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे.
The 3-way race to the semi-finals is at its climax! 🔥
Which two teams from Group A will make the Top 4? 🤔
ICC Women’s #T20WorldCup 👉 #INDvAUS | SUN, 28th JUN, 6 PM pic.twitter.com/TrGVDvCVGb
— Star Sports (@StarSportsIndia) June 27, 2026
मैदानात उतरण्यापूर्वीच भारतासमोर असतील सर्व समीकरणे –
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. मात्र, याच मैदानावर दुपारी ३:०० वाजता दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे भारत मैदानात उतरण्यापूर्वीच सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झालेले असेल.
जर आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला आणि त्यांचा रनरेट भारतापेक्षा सरस झाला, तर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ विजयच नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. याउलट, आफ्रिकेचा रनरेट न सुधारल्यास भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियावर कोणत्याही प्रकारे केवळ विजय मिळवणे पुरेसे ठरेल. या दुहेरी आव्हानाचा सामना करण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिची सेना सज्ज झाली आहे.





