ICC World Test Championship : भारताचा आता ऑस्ट्रेलियाशी #WTC23 अंतिम सामना

दुबई – श्रीलंकेचा पराभव करत न्यूझीलंडने भारतीय संघाला एक भेट दिली. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकणे गरजेचे होते, तसेच न्यूझीलंडकडून श्रीलंका पराभूत होणे महत्वाचे होते. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना अनिर्णित राहिला असला तरीही श्रीलंकेला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र ठरला आहे.
भारताविरुद्धच्या इंदुर कसोटीत विजय मिळवल्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने यापूर्वीच अंतिम फेरी गाठली होती. अहमदाबादमध्ये सोमवारी अनिर्णित राहिलेल्या कसोटीत भारताला विजयाची गरज होती. मात्र, ते घडू शकले नाही व त्यामुळे सपूर्ण लक्ष्य श्रीलंका व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या निकालाकडेच लागले होते.
#INDvAUS 4th Test : चौथी कसोटी अनिर्णित, भारताचा 2-1 ने मालिका विजय
जर श्रीलंकेने विजय मिळवला असता तर भारतीय संघाचे स्थान संपूष्टात आले असते. मात्र, न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्याने आता भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर येत्या 7 ते 11 जून या कालावधीत हा अंतिम सामना होणार आहे.
#NZvSL 1st Test : श्रीलंकेचा पराभव भारताच्या पथ्यावर; Sri Lanka जिंकली असती तर….
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. गेल्या वेळी भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता, आता मात्र, यंदा विजेतेपद मिळवण्याच्याच इर्षेने संघ सहभागी होणार आहे.





