भारताने UNHRC मध्ये पाकला दाखवला आरसा ; म्हणाले,”आम्हाला सल्ला…”

India Pakistan UNHRC। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला भारताने कडक संदेश दिला आहे. भारताने यावेळी “जो देश स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार करतो तो इतरांना मानवी हक्कांबद्दल कसे उपदेश करू शकतो? याविषयीचा सल्ला त्यांनी आम्हाला देऊ नये.” असे म्हटले आहे.
भारतीय राजदूत मोहम्मद हुसेन यांनी जिनेव्हा याठिकाणी UNHRC च्या ६० व्या सत्राच्या ३४ व्या बैठकीत भाग घेतला. त्यावेळी बोलताना, “पाकिस्तानसारखा देश इतरांना मानवी हक्कांबद्दल उपदेश करण्याचा प्रयत्न करतो हे भारताला अत्यंत विरोधाभासी वाटते. इतरांना प्रश्न विचारण्यापूर्वी, त्याने स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांकडे पाहिले पाहिजे.”असे म्हणत पाकला पुन्हा एकदा आरास दाखवला.
पाकिस्तान, खोटे बोलण्याचे यंत्र India Pakistan UNHRC।
पाकिस्तान अनेक वेळा भारताविरुद्ध खोटे बोलत आहे. त्याने भारतावर वारंवार गंभीर मानवी हक्कांचे आरोप केले आहेत, परंतु सत्य हे आहे की पाकिस्तान स्वतः दहशतवादासाठी जबाबदार आहे आणि त्याच्या भूमीवर दररोज निष्पाप लोक आपले प्राण गमावतात. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत, जसे की अनेक अहवालांमध्ये उघड झाले आहे.
पीओकेमध्येही निष्पाप लोकांना केले लक्ष्य India Pakistan UNHRC।
पाकव्याप्त काश्मीरमध्येही दररोज निदर्शने होत आहेत. बलुच नॅशनल मुव्हमेंटची मानवाधिकार संघटना, पांकने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ७८५ बेपत्ता आणि १२१ खून झाल्याची नोंद केली आहे. पश्तून संघटनांनीही महत्त्वाचे दावे केले आहेत, एका वर्षात जवळजवळ ४,००० बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे आकडे सार्वजनिकरित्या उपलब्ध असले तरी, पाकिस्तानमध्ये असे अनेक व्यक्ती आहेत जे बेपत्ता झाले आहेत किंवा त्यांची हत्या झाली आहे, परंतु माहिती अद्याप गुपित आहे.





