पाकिस्तानच्या छंब, सियालकोटमध्ये आपत्कालीन परिस्थिती ; पाक सैन्याने लोकांना दिले ‘हे’ निर्देश

India-Pakistan Tension । जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे, त्यामुळे शेजारील देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या कारवाईनंतर, पाकिस्तानच्या छंब आणि सियालकोट सेक्टरमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानचा छांब सेक्टर जम्मूच्या अखनूर सेक्टरच्या विरुद्ध आहे आणि नियंत्रण रेषेवर आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचा सियालकोट सेक्टर देखील अखनूर सेक्टरला लागून आहे आणि तो आंतरराष्ट्रीय सीमेवर येतो. गुरुवारी रात्री उशिरा पेशावरमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाल्याची नोंद झाली, तर सीमेपलीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर भारताने पाकिस्तानवर मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला. भारतीय क्षेपणास्त्रांनी लाहोर, सियालकोट आणि कराचीसह पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केले. बहावलनगर कॅन्टजवळही एक स्फोट झाला.
बलुचिस्तानने एक तृतीयांश क्षेत्रावर ताबा असल्याचा दावा India-Pakistan Tension ।
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने बलुचिस्तानचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. वृत्तानुसार, अफगाणिस्तान आणि इराणच्या हद्दीला लागून असलेल्या पाकिस्तानी चौक्या सोडून सैन्य पळून गेले. याआधी, बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर अनेक हल्ले झाले होते. पाकिस्तानी लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाला बंदूकधाऱ्यांनी लक्ष्य केले. गोळीबार झाला आणि त्यानंतर अनेक स्फोट झाले.
कराचीमध्ये स्फोट India-Pakistan Tension ।
भारताच्या प्रत्युत्तरानंतर, कराचीच्या १५ भागात स्फोट झाले आणि बंदरावर ८ ते १२ स्फोट झाले, त्यानंतर तेथे ब्लॅकआउट करण्यात आले आणि मोबाईल सिग्नल देखील खंडित झाला. यासोबतच, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगचे सामनेही रद्द करून दुबईला हलवण्यात आले. आहेत.
हेही वाचा
लक्षवेधी : शिष्यवृत्ती विलंबाचा परिणाम





