‘भारत-पाकिस्तान डीजीएमओ यांच्यातील चर्चेनंतर युद्धबंदी…’ ; जयशंकर यांचे ट्रम्प यांना थेट प्रत्युत्तर

India Pakistan Ceasefire। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान आपण युद्धबंदी पूर्ण केल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केलेला दाव्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. जयशंकर यांनी, “भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चेनंतर झाली आणि कोणत्याही व्यापार कराराची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.” असे म्हणत ट्रम्प यांना थेट उत्तर दिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी,”अमेरिकेने व्यापार थांबवण्याची धमकी दिली होती आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान युद्धातून माघार घेत आहेत.” असे म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पणीवर, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये माध्यमांशी बोलताना, ‘त्या काळात जे घडले त्याची नोंद अगदी स्पष्ट होती आणि युद्धबंदी ही अशी गोष्ट होती ज्यावर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली होती.”असे म्हणालेत. तसेच जयशंकर पुढे म्हणाले, ‘मी आता ते इथेच सोडतो.’ ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला होता परंतु १० मे रोजी दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे युद्धबंदीची माहिती दिली होती.
भारताने हवाई हल्ले केले होते India Pakistan Ceasefire।
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी तळांवर मोठा हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात भारताने पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
१० मे रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी जाहीर केले होते की पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी भारतीय डीजीएमओंना फोन केला होता आणि दोन्ही देश लष्करी कारवाई थांबवतील असा करार झाला होता. अलिकडेच, न्यूजवीकशी झालेल्या संभाषणादरम्यान जयशंकर यांनी असेही म्हटले होते की ९ मे रोजी रात्री जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले तेव्हा ते त्याच खोलीत उपस्थित होते. India Pakistan Ceasefire।
हेही वाचा
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; पहा दिल्लीपासून मुंबई पर्यंतच्या नवीन किमती किती ?





