Blind Women T20 World Cup : भारतीय दृष्टीहीन महिला संघाने पटकावला पहिला-वहिला टी-२० विश्वचषक

Indian Blind Womens Team won T20 world cup 2025 : भारताच्या महिला क्रिकेटसाठी नोव्हेंबर महिना दुहेरी आनंदाचा ठरला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, आता भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने पहिला-वहिला टी-२० विश्वचषक जिंकून या यशावर कळस चढवला आहे. कर्णधार दीपिका टीसीच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला.
रविवारी (२३ नोव्हेंबर) श्रीलंकेच्या कोलंबोमधील पी सारा ओव्हल मैदानावर हा अंतिम सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या अचूक गोलंदाजीपुढे नेपाळचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून केवळ ११४ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे माफक लक्ष्य अवघ्या १२.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.
We are the Champions – SBI 1st Women’s T20 World Cup Cricket for the Blind 2025 pic.twitter.com/QX1DHsyYTJ
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 23, 2025
फुला सरेन ठरली ‘सामनावीर’ –
🏅 PLAYER OF THE MATCH — PHULA SAREN
India Women
What a sensational all-round performance! 🔥Batting:
• 44 runs
• 27 balls
• 4 fours
• Strike Rate: 162.96A match-winning knock at the top and solid contribution with the ball — a true clutch performance in the final! 💙🇮🇳 pic.twitter.com/fdNrWDbLq1
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 23, 2025
भारताच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली फुला सरेन. तिने लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ २७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावांची वेगवान खेळी केली. फलंदाजीपूर्वी फुला सरेनने गोलंदाजीतही ३ षटके टाकून २० धावा दिल्या होत्या. तिच्या याच अष्टपैलू कामगिरीबद्दल तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कर्णधार दीपिका टीसी आणि स्पर्धेतील प्रवास –
Unstoppable! 🇮🇳 India clinches the SBI 1st Women’s T20 World Cup Cricket for the Blind 2025 without losing a single match! 🏆 #Champions #TeamIndia” pic.twitter.com/ZuN9G1ruUY
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 23, 2025
या ऐतिहासिक संघाचे नेतृत्व दीपिका टीसीनेकेले. कर्नाटकची रहिवासी असलेल्या दीपीकाने लहानपणी अपघातात आपली दृष्टी गमावली, परंतु शालेय जीवनात तिने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. गंगा कदम या संघाच्या उपकर्णधार होती. हा टी-२० विश्वचषक ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीत सुरू झाला होता.
One more World Cup for India! 🏆 SBI 1st Women’s T20 World Cup Cricket for the Blind 2025 pic.twitter.com/OcU5IJJCVS
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 23, 2025
या स्पर्धेत भारत, नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि पाकिस्तान या ६ संघांचा सहभाग होता. बाद फेरीचे सामने कोलंबोमध्ये खेळले गेले. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने, तर नेपाळने पाकिस्तानला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
हेही वाचा – IND vs SA : मार्को यान्सन बनला नवा ‘सिक्सर किंग’! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू
ब्लाइंड क्रिकेटचे नियम आणि खेळण्याची पद्धत –
दृष्टीहीन खेळाडूंचे क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा वेगळ्या पद्धतीने खेळले जाते.
- चेंडू: यामध्ये बेअरिंगने भरलेला पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो. बेअरिंगच्या आवाजामुळे खेळाडूंना चेंडू कोणत्या दिशेने येत आहे, याचा अंदाज घेता येतो.
- गोलंदाजी: गोलंदाजी करण्यापूर्वी गोलंदाजाला फलंदाजाला ‘तयार आहे का?’ असे विचारावे लागते आणि त्यानंतर ‘प्लेय’ असे मोठ्याने बोलून चेंडू सोडावा लागतो. गोलंदाजी केवळ अंडरआर्म पद्धतीने केली जाते आणि चेंडूचा कमीत कमी एक टप्पा पडणे बंधनकारक असते.
- खेळाडू रचना: ११ खेळाडूंच्या संघात किमान चार खेळाडू पूर्णपणे दृष्टीहीन असणे आवश्यक असते.





