Shahid Afridi | भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध बरळत आहे. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. मात्र आफ्रिदीला पाकिस्तानला विजय मिळवल्यासारखं वाटतं आहे. शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये विजयी यात्रा देखील काढली होती. आफ्रिदीने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप करत पाकिस्तानच्या विकासात भारत अडथळे आणत असल्याचे म्हंटले आहे. “भारत विकास करत असून त्यांच्या विकासामुळे आम्ही आनंदी आहोत. भारतीय क्रिकेटही पुढे जात आहे, ही चांगली बाब आहे. पण आम्हाला रोखले जात आहे. कारण पाकिस्तान वेगाने प्रगती करत आहे. आपण पुढे जात असताना, आपल्याला थांबवलं जात आहे. भारत पाकिस्तानच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे. भारताला पाकिस्तानची प्रगती पहावत नाही,” असं म्हणत आफ्रिदीने अकलेचे तारे तोडले. शाहीद आफ्रिदी कायम भारताबद्दल गरळ ओकत असतो. शाहिद आफ्रिदी याचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अंसार हा 2003 साली भारतीय सैन्यासोबत अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. बीएसएफला शाकिबकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन ही गोष्ट सिद्ध झाली होती. मात्र, तेव्हा आफ्रिदीने शाहीद हा आपला भाऊ नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच शाहिद आफ्रिदी भारतीय सैन्याचं द्वेष करत असल्याचे कारण सांगितले जाते. Shahid Afridi | पंतप्रधान मोदींवरही साधला होता निशाणा याआधी आफ्रिदीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धाच्या खुमखुमीने भारताला संकटात ढकलले आहे. पाकिस्तानचा सामना करणे किती महागात पडते हे पंतप्रधान मोदींना आता कळाले असेल, असे म्हटले होते. Shahid Afridi | हेही वाचा: शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, कारवाईत ८४ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त